तुर्कीचा नेमबाज युसुफ दिकेक यांनी कोणत्याही स्पेशल लेन्स, गॉगल्स, Eye covers व Ear protections व प्रोटेक्शन्स विना पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मिक्स्ड १० मीटर एअर पिस्तोल स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले! आनंद महिंद्रा यांनी तुर्की नेमबाजाचे कौतुक करताना म्हटले आहे की या नेमबाजाने “स्वॅग” या शब्दाचा खरा अर्थ सांगितला आहे.
युसुफ दिकेक: स्वॅगचा नवा अर्थ
तुर्कीचे नेमबाज युसुफ यांनी “स्वॅग” या शब्दाचा अर्थ नव्याने दिला आहे, असे आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कौतुकाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ५१ वर्षीय दिकेक यांनी पॅरिस ऑलिंपिक मध्ये मिक्स्ड १० मीटर एअर पिस्तोल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि त्यांच्या नेमबाजीच्या शैलीमुळे इंटरनेटवर खळबळ उडवून दिली – एक हात खिशात ठेवून!
“स्वॅग” हेच, महिंद्रा म्हणाले, तसेच अनेकांनी दिकेकच्या सहजतेच्या शैलीला प्रोत्साहन दिले.
सोशल मीडियावर व्हायरल
एक्स (पूर्वीच्या ट्विटर) पोस्टमध्ये, महिंद्रांनी दिकेकच्या या स्पर्धेतील व्हायरल झालेला एक फोटो शेअर केला, त्यासोबत मथळा होता: “स्वॅग. या माणसाने आपल्याला या शब्दाचा अर्थ समजावला.”
५१ वर्षीय युसुफ दिकेकची आरामशीर आणि अचूक कामगिरी, ज्यामध्ये ते फक्त चष्मा आणि कानातले विशेष प्रोटेक्शन विना फक्त साधे बड्स लावून एका हातात पिस्तूल व दुसरा हात खिशात ठेवून नेमबाजी करत होते, अनेकांना आश्चर्यचकित केले. विशेष उपकरणांचा अभाव असूनही, ते आणि त्यांची साथीदार शेवल इलयादा तारहान यांनी रौप्य पदक जिंकले.
दिकेकने पदक जिंकल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या “अद्वितीय” आणि “प्रेरणादायक” कामगिरीची चर्चा होत आहे, आणि अनेकांनी मान्य केले की “आत्मविश्वास आणि कौशल्य सर्वात महत्वाचे आहे”. युसुफ दिकेकचे मीम्स देखील एक्स वर व्हायरल झाले आहेत.
पहिलं ऑलिंपिक पदक
हे दिकेकचे पाचव्या ऑलिंपिकमध्ये पहिले पदक आहे, बीजिंग २००८ मधील त्यांच्या पदार्पणापासून हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
युसुफ दिकेकचे चमकदार करिअर
युसुफ यांनी नेमबाजीत एक उल्लेखनीय करिअर केले आहे. १ जानेवारी १९७३ रोजी गोकसुन, तुर्की येथे जन्मलेल्या दिकेक यांनी गाझी विद्यापीठातून शारीरिक प्रशिक्षण आणि शिक्षण विषयात पदवी घेतली आहे, तसेच सेलकुक विद्यापीठातून प्रशिक्षक म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा प्रवासाने त्यांच्या खेळातील समर्पण अधोरेखित केले आहे.
युसुफ दिकेकची प्रेरणादायी कथा आणि त्यांचा आत्मविश्वास यामुळे ऑलिंपिकचा हा क्षण लक्षवेधी ठरला आहे. नेमबाजीच्या कलेत, त्यांची अदा म्हणजे खरंच स्वॅग!
कोण आहे सरबज्योत सिंह ? ज्याने ऑलिम्पिक पदार्पणातच कांस्य पदक मिळविले !