भारत सरकारचे मोदी 3.0 मंत्रिमंडळातील राज्यमंत्री, त्यांची खाती, मतदारसंघ व शिक्षणाविषयी माहिती

नरेंद्र मोदी 3.0 सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पहिल्या लेखामध्ये आपण कॅबिनेट मंत्र्यांच्या खाते, मतदारसंघ व शिक्षणा विषयी माहिती घेतली. आता आपण मंत्रिमंडळातील राज्यमंत्री, त्यांची खाती, मतदारसंघ व शिक्षणाविषयी माहिती घेऊया.

भारत सरकारचे मोदी 3.0 मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री
भारत सरकारचे मोदी 3.0 मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार असलेले)

  1. राव इंदरजीत सिंह
खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सांस्कृतिक मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता1974 साली दिल्ली विद्यापीठातून एलएलबी
1971 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए (ऑनर्स)
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यगुरुग्राम, हरियाणा

2. डॉ. जितेंद्र सिंग

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओविज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
पंतप्रधान कार्यालया तील राज्यमंत्री
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री
अणुऊर्जा आणि अंतराळ विभागातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताMBBS, MD (औषध), फेलोशिप (मधुमेह)
MNAMS (मधुमेह आणि एंडोक्राइनोलॉजी), Hon.Ph.D.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यउधमपूर, जम्मू आणि काश्मीर

3. अर्जुन राम मेघवाल

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताएमए (पॉलिटिकल सायन्स), एलएलबी, एमबीए
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबिकानेर, राजस्थान

4. जाधव प्रतापराव गणपतराव

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओआयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता१९९५ मध्ये बीए भाग १, शिवाजी महाविद्यालय, चिखली, नागपूर विद्यापीठ, नागपूर
पक्षशिवसेना (शिंदेगट)
मतदारसंघ, राज्यबुलढाणा, महाराष्ट्र

5. जयंत चौधरी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
शैक्षणिक पात्रतालंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मधून
लेखा आणि वित्त विषयात पदव्युत्तर पदवी
पक्षराष्ट्रीय लोक दल
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्यमंत्री:

  1. जितीन प्रसाद
खात्याचा पदभार/पोर्टफोलिओवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील राज्यमंत्री,
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतादिल्ली विद्यापीठाच्या राम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून वाणिज्य शाखेतील पदवी
आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली (International Management Institute, New Delhi) येथून एमबीए पूर्ण केले.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यपिलिभीत, उत्तर प्रदेश

2. श्रीपाद येसो नाईक

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओऊर्जा मंत्रालयात राज्यमंत्री
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रताबीए बॉम्बे युनिव्हर्सिटी-1978
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यउत्तर, गोवा

3. पंकज चौधरी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओअर्थ मंत्रालयात राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यमहाराजगंज, उत्तर प्रदेश

4. कृष्ण पाल गुर्जर

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसहकार
शैक्षणिक पात्रता1978 मध्ये जवाहरलाल नेहरू कॉलेजमधून पदवी
आणि मेरठ विद्यापीठातून कायद्याची पदवी.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यफरिदाबाद, हरियाणा

5. रामदास आठवले

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण
पक्षRPI (A) [रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)]
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

6. रामनाथ ठाकूर

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता12 वी उत्तीर्ण
पक्षजनता दल (युनायटेड)
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

7. नित्यानंद राय

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओगृह मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता1986 मध्ये आरएन कॉलेज, हाजीपूर, बिहार विद्यापीठातून बीए (ऑनर्स)
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यउजियारपूर, बिहार

8. श्रीमती. अनुप्रिया पटेल

खात्याचा पदभार / पोर्टफोलिओआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया तील राज्यमंत्री;
रसायने आणि खते मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर
पक्षअपना दल (S)
मतदारसंघ, राज्यमिर्झापूर, उत्तर प्रदेश

9. व्ही. सोमन्ना

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओजलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री
रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रताव्ही.व्ही. पुरा इव्हिनिंग कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्य
तुमकुर, कर्नाटक

10. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री,
दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रता2005 मध्ये Daaville, Pennsylvania USA मधील Geisinger मेडिकल सेंटर येथे MD इंटर्नल मेडिसिन
आणि NTR युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, आंध्र प्रदेश मधून वर्ष 1999 मध्ये MBBS
पक्षतेलगू देसम पार्टी
मतदारसंघ, राज्यगुंटूर, आंध्रप्रदेश

11. प्रा.एस.पी.सिंग बघेल

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालया तील राज्यमंत्री
पंचायती राज मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताचौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठ मधून 2004 मध्ये पीएच.डी.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यआग्रा, उत्तर प्रदेश

12. शोभा करंदलाजे

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील राज्यमंत्री
श्रम आणि रोजगार मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर पदवी
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबंगळुरू उत्तर, कर्नाटक

13. कीर्तिवर्धन सिंग

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालया तील राज्यमंत्री
परराष्ट्र मंत्रालया तील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतालखनौ विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स (एमएससी) पदवी
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यगोंडा, उत्तर प्रदेश

14. बी. एल. वर्मा

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओग्राहक व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री,
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतासंपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ वाराणसी येथून 2003 मध्ये पदव्युत्तर (शिक्षक)
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

15. शंतनू ठाकूर

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओबंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रताकर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून 2015 मध्ये बीए उत्तीर्ण
आणि 2010 मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये ऍडवान्सड डिप्लोमा,
कॅरिक इन्स्टिटयूट ऑफ एज्युकेशन, सिडनी, ऑस्ट्रेलिया मधून
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबनगाव, पश्चिम बंगाल

16. सुरेश गोपी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील राज्यमंत्री
पर्यटन मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताप्राणीशास्त्रातील विज्ञान पदवी आणि इंग्रजी साहित्यात मास्टर ऑफ आर्ट्स पदवी.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यत्रिशूर, केरळ

17. डॉ. एल. मुरुगन

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओमाहिती आणि प्रसारण मंत्रालयातील राज्यमंत्री
संसदीय कामकाज मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता2019 मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (कायदा), मद्रास विद्यापीठ
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

18. अजय टम्टा

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रता1993 मध्ये कृषी इंटर कॉलेज दोकड अल्मोरा येथून इंटरमिजिएट
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यअल्मोडा, उत्तराखंड

19. बंडी संजय कुमार

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओगृह मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतामधुराई खमराज विद्यापीठ, तमिळ नायडू येथून एमए
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यकरीमनगर, तेलंगणा

20 .कमलेश पासवान

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता2012 मध्ये DDU विद्यापीठ गोरखपूर मधून बीए
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबासगाव, उत्तर प्रदेश

21. भगीरथ चौधरी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतामाध्यमिक शिक्षा बोर्ड राजस्थानमधून उच्च माध्यमिक उत्तीर्ण, 1972
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यअजमेर, राजस्थान

22. सतीशचंद्र दुबे

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकोळसा मंत्रालयात राज्यमंत्री,
खाण मंत्रालयात राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताहायस्कूल नरकटियागंज, BSIC मधून 1991 मध्ये मॅट्रिक
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

23. संजय सेठ

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसंरक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रतापदवीधर
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यरांची, झारखंड

24. रवणीत सिंह बिट्टू

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातील राज्यमंत्री, रेल्वे मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतामार्च 1993 मध्ये गुरू नानक पब्लिक स्कूल से-36, चंदीगडमधून 12वी उत्तीर्ण, सीबीएसई
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यलुधियाना, पंजाब (लोकसभा इलेक्शन 2024 ला 20942 मतांनी हरलेत.)

25. दुर्गादास उईके

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओआदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताबरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ येथून 1994 मध्ये B.Ed आणि 2003 मध्ये MA
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबैतुल, मध्यप्रदेश

26. श्रीमती. रक्षा निखिल खडसे

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओयुवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रताश्रीमती जीजी खडसे कॉलेज मुक्ताईनगर जळगाव येथून बी.एससी (संगणक),
सन 2005 मध्ये केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स कॉलेज नाशिकमधून एचएससी.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यरावेर, महाराष्ट्र

27. सुकांता मजुमदार

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओशिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताM.Sc, B.Ed, आणि उत्तर बंगाल विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएचडी पदवी. ते पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील गौर बंगा विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक देखील आहेत.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबालूरघाट, पश्चिम बंगाल

28. श्रीमती. सावित्री ठाकूर

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओमहिला आणि बालविकास मंत्रालयातील राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यधार, मध्य प्रदेश

29. तोखान साहू

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रता1996 मध्ये एसएनजी कॉमर्स कॉलेज मुंगेली, गुरुगासीदास विद्यापीठ बिलासपूर मधून एम.कॉम.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यबिलासपूर, छत्तीसगड

30. डॉ राज भूषण चौधरी

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओजलशक्ती मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रता२००८ मध्ये दरभंगा सायन्स कॉलेज, लाहेरियासरे येथून एमडी,
२००० मध्ये पाटलीपुत्र सायन्स कॉलेज मधून एमबीबीएस,
१९९४ मध्ये हसनपूर कॉलेज हसनपूर रोड, समस्तीपूर येथून इंटरमिजिएट,
१९९२ मध्ये सरस्वती स्कूलमधून मॅट्रिक
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यमुजफ्फरपूर, बिहार

31. भूपती राजू श्रीनिवास वर्मा

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओअवजड उद्योग मंत्रालयातील राज्यमंत्री
पोलाद मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतापदव्युत्तर
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यनरसापूरम, आंध्रप्रदेश

32. हर्ष मल्होत्रा

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतापदवीधर
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यपूर्व दिल्ली

33. श्रीमती. निमुबेन जयंतीभाई बांभनिया

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रतागुलाबराय एच. संघवी एज्युकेशन कॉलेज भावनगर, भावनगर विद्यापीठातून बी.एड
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यभावनगर, गुजरात

34. मुरलीधर मोहोळ

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओसहकार मंत्रालयातील राज्यमंत्री
नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शाहू महाविद्यालयातून ऑक्टोबर 1999 मध्ये बी.ए.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यपुणे, महाराष्ट्र

35. जॉर्ज कुरियन

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओअल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री;
आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयातील राज्यमंत्री
शैक्षणिक पात्रताकायदा पदवीधर. त्यांनी हिंदीतही पदवी घेतली आहे.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यकेरळ (सध्या लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत.)

36. पवित्रा मार्गेरिता

खात्याचा पदभार/पोर्टफोलिओपरराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्रालयात राज्यमंत्री.
शैक्षणिक पात्रताराज्य तंत्रशिक्षण आसाम अंतर्गत आसाम टेक्सटाईल इन्स्टिट्यूट गुवाहाटी येथून
टेक्सटाईल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा.
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदारसंघ, राज्यराज्यसभा

संबंधित:

भारताचे मंत्रिमंडळ 2024: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, मंत्र्यांची खाती व त्यांची शैक्षणिक पात्रता

Leave a comment