दिल्लीतील सैनिक विहारमध्ये एक साध्या हातगाडीसह सुरू झालेला प्रवास, आज चंद्रिका दीक्षितला बिग बॉस OTT सीजन 3 पर्यंत घेऊन आला आहे. या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासात चंद्रिका दीक्षितने अनेक अडथळे पार केले, पण त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने त्यांना एक वेगळे स्थान मिळवून दिले. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अद्भुत प्रवासाबद्दल.
चंद्रिका दीक्षितचे प्रारंभिक जीवन आणि नोकरी
चंद्रिका दीक्षित मूळची इंदोर, मध्यप्रदेश मध्ये जन्मलेली मुलगी. एक वर्षांची असतांना आई-वडील वारले. आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने दिल्ली ला हल्दीराम कंपनीमध्ये नोकरी धरली. तिचा पती, यश गेरा, रॅपिडो कंपनीत काम करत होते जिथे त्यांना पहाटे चार वाजे पासून रात्रीचे बारा-बारा वाजेपर्यंत काम करावे लागत असे. जीवन साधे पण स्थिर होते.
मात्र, त्यांच्या आयुष्यात एक वळण आले जेव्हा तिच्या मुलाला डेंगू झाला आणि पतीच्या अनियमित कामाच्या वेळांमुळे तिला खूप त्रास झाला. या परिस्थितीत, चंद्रिका दीक्षितला नोकरी सोडावी लागली. पण घर-संसार चालविण्यासाठी नवऱ्याची होणारी ओढताण बघून संसाराला हातभार लावण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला.
सैनिक विहारमध्ये फूड स्टॉल (वडापाव ची हातगाडी) ची सुरुवात
खाण्याची आणि स्वयंपाकाची आवड असल्याने जिद्दीने चंद्रिका दीक्षितने दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये फूड स्टॉल म्हणजेच वडापाव ची हातगाडी लावली. सुरुवातीला तिला अनेक अडचणी आल्या पण तिच्या हाताचा वडापाव खास बनला. त्यांच्या वडापावची चव आणि गुणवत्ता लवकरच प्रसिद्ध झाली. लोक दूरवरून त्यांचा वडापाव आणि त्याबरोबरच्या चटणी चा आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले. धंदा वाढत चालला तसा तिने धंद्यात कुटुंबीयांचे सहकार्य घेण्यास सुरुवात केली.
प्रसिद्धीची सुरूवात
चंद्रिका दीक्षितच्या वडापावच्या स्टॉलची लोकप्रियता वाढली तेव्हा फूड व्लॉगर अमित जिंदल यांनी त्यांच्या स्टॉलचा ब्लॉग केला. या ब्लॉगमध्ये चंद्रिकाच्या वडापाव बनवण्याच्या कौशल्याचे वर्णन होते. हा ब्लॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चंद्रिका रातोरात सोशल मीडिया सेंसेशन बनली. यानंतर तीच्या स्टॉलवर लोकांची रांग लागली.
अडथळे आणि संघर्ष
लोकप्रियतेसोबतच चंद्रिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दिल्ली नगर निगम (MCD) च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उत्पीड़नाचे आरोप लावले. चंद्रिकाने 35,000 रुपये शुल्क दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी तिला त्रास दिला. तिने यावर एक व्हिडिओ तयार केला ज्यामध्ये ती रडत होती आणि त्यांची कहाणी सांगत होती. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे चंद्रिकाला लोकांची सहानुभूती मिळाली आणि तिच्या संघर्षाची कथा सर्वांपर्यंत पोहोचली.
सहकार्य आणि पुढील पाऊल
चंद्रिकाच्या वडापाव स्टॉलच्या लोकप्रियतेमुळे अनेकांनी वडापावचा व्यवसाय सुरू केला. स्पर्धा वाढली तेव्हा चंद्रिकाने ‘डॉली चायवाला’ सुनील पाटिल आणि ‘बिग बॉस’ फेम सनी आर्या, पुनीत सुपरस्टार यांच्या सोबत काम केले. तिने आपल्या वडापाव व्यवसायात नवीन कल्पना आणल्या आणि लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
यशस्वी व्लॉगर आणि बिग बॉस OTT प्रवेश
चंद्रिका दीक्षित फक्त वडापाव गर्लच राहिली नाहीत तर तिने यूट्यूबवर व्लॉगर म्हणून देखील आपला ठसा उमटवला. तीची मेहनत आणि जिद्द यामुळेच आज ती बिग बॉस OTT सीजन 3 मध्ये झळकणार आहेत. यावेळी सलमान खान ऐवजी अनिल कपूर होस्ट करत असलेल्या लोकप्रिय बिग बॉस च्या घरात चंद्रिका प्रवेश करणार असून, तिच्या चाहत्यांना तिच्या प्रवासाचे पुढील पाऊल पाहायला मिळणार आहे.
चंद्रिका दीक्षितची ही कथा आपल्याला शिकवते की मेहनत आणि जिद्दीने कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. तिच्या प्रवासाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे आणि तिने हे दाखवून दिले की कष्ट आणि चिकाटीने यश मिळवता येते. आज ती ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि तिने आपल्या जीवनाची नवी दिशा दिली आहे.
भारतीय गाय 40 कोटींना विकली! जगातील सर्वात महाग विक्री झालेली गाय ठरली!