ग्राहक न्यायालयाने पेटीएमला ₹12 हजार दंड ठोठावला: पुण्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने किराणा दुकानदाराच्या पेटीएम खातं अकारण गोठवल्याप्रकरणी पेटीएमवर ₹12,000 दंडात्मक कारवाईचा आदेश दिला आहे. [दिनेश भवरलाल चौधारी विरुद्ध पेटीएम बँक]
ग्राहक न्यायालयाने पेटीएमला ₹12 हजार दंड ठोठावल्याचे थोडक्यात प्रकरण:
- तक्रारदार: दिनेश भवरलाल चौधरी, किराणा दुकानदार
- प्रतिवादी: पेटीएम बँक
- आरोप: दुकानदाराचे ₹62,633.94 रकमेचे खाते 13 जून 2022 रोजी कोणतेही कारण न देता गोठवण्यात आले.
आयोगाचे अध्यक्ष श्री. अनिल बी. जावळेकर आणि सदस्या श्रीमती सरिता एन. पाटील यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे की, तक्रार दाखल झाल्यानंतर पेटीएमने खाते गोठवण्याचे (फ्रीझ करण्याचे) कारण न देता खाते चालू (अनफ्रीझ) केले.
“या आयोगाच्या मते, प्रतिवादी पक्षाने तक्रारदाराचे पेटीएम खाते दोन महिन्यांनंतर चालू केले असले तरी ते खाते गोठवण्याचे कारण देण्यात अपयशी ठरले आहेत. प्रतिवादी पक्षाच्या कृत्यामुळे तक्रारदाराला खूप त्रास सहन करावा लागला, ज्यामुळे ही सेवाभंगाची घटना ठरते,” असे 7 मे रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
किराणा दुकानदाराच्या तक्रारीनुसार, त्याच्या ₹62,633.94 रकमेच्या शिल्लक राशी असलेले खाते 13 जून 2022 रोजी कोणतेही कारण न देता गोठवण्यात आले.
त्यांनी केलेल्या समर्थन तिकिटांवर आणि तक्रारीवर कोणताही प्रतिसाद मिळाल नाही, तेव्हा त्यांनी पुण्यातील जिल्हा ग्राहक न्यायालय येथे संपर्क साधला.
तक्रार दाखल केल्यानंतर पेटीएमने त्याचे खाते चालू केले असले तरी त्यांनी मानसिक त्रास आणि सेवाभंगाची भरपाई मागितली.
आयोगाने नोंदवले आहे की, खाते जवळपास दोन महिने गोठवण्यात आले होते आणि आयोगाकडे येण्यापूर्वी तक्रारदाराने त्याची समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.
“तक्रार सोडवण्यासाठी तक्रारदाराने प्रतिवादी पक्षाशी कठोर पाठपुरावा केला होता, परंतु प्रतिवादी पक्ष उपयुक्त तोडगा काढण्यात आणि तक्रार सोडवण्यात अपयशी ठरला,” असे आयोगाने म्हटले आहे.
यानंतर, खाते चालू करण्यात आले असले तरी ते गोठवण्याचे कारण देण्यात आले नाही, असे आयोगाने नमूद केले. आयोगाच्या मते, ही सेवाभंगाची घटना आहे.
आयोगाने असे ठरवले की, खाते गोठवल्याच्या कालावधीसाठी तक्रारदाराला त्याच्या बँक शिल्लक राशीवर 5 टक्के दराने वार्षिक व्याज मिळण्याचा हक्क आहे.
त्यानुसार, आयोगाने 45 दिवसांच्या आत व्याज भरण्याचे निर्देश दिले आणि मानसिक वेदनाबद्दल ₹7,000 आणि खटला खर्चाच्या रुपात ₹5,000 असे पेटीएम बँकेला दंडात्मक रक्कम भरण्याचे आदेश दिले. असे एकूण पेटीएमला ₹12 हजार दंड ठोठावला आहे.
सिबिल (CIBIL) स्कोअर सुधारण्याचे 10 सोप्पे मार्ग – जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात !