भारताचे मंत्रिमंडळ 2024: केंद्रीय कॅबिनेट मंत्री, मंत्र्यांची खाती व त्यांची शैक्षणिक पात्रता

भारताचे मंत्रिमंडळ 2024: 9 जून, 2024 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून मा. श्री. नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधानांच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या सुमारे बहात्तर जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. मोदी सरकारचे मंत्रिमंडळ सुशिक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे, अनेक मंत्र्यांनी जगभरातील विविध विद्यापीठांमधून विशिष्ट पदवी धारण केलेली आहेत. हा लेख विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास आणि त्यांच्या परीक्षेची तयारी सुधारण्यास नक्कीच मदत करील.

भारताचे कॅबिनेट मंत्रिमंडळ 2024

पंतप्रधान: नरेंद्र मोदी

नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खालील खाती आहेत:

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री.
अणुऊर्जा विभाग
अंतराळ विभाग
सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे; आणि
इतर सर्व पोर्टफोलिओ जे मंत्र्याला दिलेले नाहीत.

शैक्षणिक पात्रता: गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) पदवी.

भारताचे कॅबिनेट मंत्री 2024

श्री राजनाथ सिंह

पदभार/ पोर्टफोलिओसंरक्षण मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यउत्तर प्रदेश, लखनऊ
शैक्षणिक पात्रता1971 मध्ये गोरखपूर विद्यापीठातून M.Sc, 1969 मध्ये KBPG कॉलेज, मिर्झापूर गोरखपूर विद्यापीठातून B.Sc.

अमित शहा

पदभार/ पोर्टफोलिओकेंद्रीय गृह मंत्री ; आणि सहकार मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्य गांधीनगर, गुजरात
शैक्षणिक पात्रता एस.वाय. बी.एससी शिक्षण. गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

नितीन जयराम गडकरी

पदभार/ पोर्टफोलिओरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यनागपूर, महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रतानागपूर विद्यापीठातून M.Com आणि LL.B.

श्रीमती. निर्मला सीतारामन

पदभार/ पोर्टफोलिओकॉर्पोरेट व्यवहार मंत्री; वित्त मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा
शैक्षणिक पात्रताअर्थशास्त्रात एम ए पदवी आणि
1984 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली मधून एम.फिल.

श्री. जगत प्रकाश नड्डा

पदभार/ पोर्टफोलिओआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री रसायने आणि खते मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा
शैक्षणिक पात्रताLL.B. कायदा संकाय, हिमाचल प्रदेश विद्यापीठ, शिमला

श्री. शिवराज सिंह चौहान

पदभार/ पोर्टफोलिओकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री ग्रामीण विकास मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यबुंदी, मध्य प्रदेश
शैक्षणिक पात्रताबरकतुल्ला विद्यापीठ भोपाळमधून एमए (तत्वज्ञान) मध्ये सुवर्ण पदक विजेता

श्री. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर

पदभार/ पोर्टफोलिओपरराष्ट्र व्यवहार मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा, गुजरात
शैक्षणिक पात्रताराज्यशास्त्रात एमए आणि एम.फिल.
आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
(JNU) मधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये
पीएचडी, जिथे त्यांनी आण्विक मुत्सद्देगिरीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले.

श्री. मनोहर लाल खट्टर

पदभार/ पोर्टफोलिओगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री ऊर्जा मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यकर्नाल, हरियाणा
शैक्षणिक पात्रतादिल्ली विद्यापीठातून बॅचलर पदवी

श्री. एचडी कुमारस्वामी

पदभार/ पोर्टफोलिओअवजड उद्योग मंत्री पोलाद मंत्री
पक्षजनता दल (सेक्युलर)
मतदार संघ व राज्यमंड्या, कर्नाटक
शैक्षणिक पात्रताबॅचलर ऑफ सायन्स
वर्ष 1978-1979,
नॅशनल कॉलेज, जयनगर बंगलोर विद्यापीठ

श्री. पियुष गोयल

पदभार/ पोर्टफोलिओवाणिज्य आणि उद्योग मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यउत्तर मुंबई, महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रताचार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांनी मुंबई विद्यापीठातून लॉ केलेला आहे

श्री. धर्मेंद्र प्रधान

पदभार/ पोर्टफोलिओशिक्षण मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यसंबलपूर, ओडिशा
शैक्षणिक पात्रताभुवनेश्वरमधील उत्कल विद्यापीठातून
मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी

श्री. जीतन राम मांझी

पदभार/ पोर्टफोलिओसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
पक्षहिंदुस्तानी आवाम मोर्चा
मतदार संघ व राज्यगया, बिहार
शैक्षणिक पात्रतामगध विद्यापीठातून पदवी

श्री. राजीव रंजन सिंग उर्फ ​​ललन सिंग

पदभार/ पोर्टफोलिओपंचायती राज मंत्री
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
पक्षजनता दल (युनायटेड)
मतदार संघ व राज्यमुंगेर, बिहार
शैक्षणिक पात्रताबॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) पदवी, TNB कॉलेज,
भागलपूर विद्यापीठ

श्री. सर्बानंद सोनोवाल

पदभार/ पोर्टफोलिओबंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा
शैक्षणिक पात्रताडिब्रूगड विद्यापीठातून एलएलबी आणि
गुवाहाटी विद्यापीठातून बीसीजे.
इंग्रजीमध्ये बीए (ऑनर्स)
डिब्रुगढ हनुमानबक्ष सूरजमल कनोई कॉलेज, दिब्रुगढ विद्यापीठ

श्री. डॉ. वीरेंद्र कुमार

पदभार/ पोर्टफोलिओसामाजिक न्याय आणि
सक्षमीकरण मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यटिकमगड, मध्यप्रदेश
शैक्षणिक पात्रताएमए (अर्थशास्त्र), पीएच.डी (बालकामगार)
डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर, मध्य प्रदेश

श्री. राम मोहन नायडू किंजरापू

पदभार/ पोर्ट-फोलिओनागरी विमान वाहतूक मंत्री
पक्षतेलगू देसम पार्टी
मतदार संघ व राज्यश्रीकाकुलम, आंध्र प्रदेश
शैक्षणिक पात्रतालाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए,
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी, पर्ड्यू विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स

श्री. प्रल्हाद जोशी

पदभार/ पोर्टफोलिओग्राहक व्यवहार मंत्री,
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यधारवाड, कर्नाटक
शैक्षणिक पात्रताबीए 1983 मध्ये कर्नाटक विद्यापीठ

श्री. जुएल ओराम

पदभार/ पोर्टफोलिओआदिवासी कार्य मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यसुंदरगड, ओडिशा
शैक्षणिक पात्रताउत्कलमणी गोपबंधू
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमधून
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

श्री. गिरीराज सिंह

पदभार/ पोर्टफोलिओवस्त्रोद्योग मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यबेगूसराय, बिहार
शैक्षणिक पात्रताकला पदवीधर (1971) मगध विद्यापीठ

श्री. अश्विनी वैष्णव

पदभार/ पोर्टफोलिओरेल्वेमंत्री;
माहिती आणि प्रसारण मंत्री;
आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा
शैक्षणिक पात्रता2010 मध्ये एमबीए
वॉर्टन बिझनेस स्कूल,
युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, यूएसए;
1994 मध्ये एम.टेक
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर;
1992 मध्ये बीई.
एमबीएम इंजिनीरिंग कॉलेज,
जोधपूर विद्यापीठ (आता जेएनव्ही विद्यापीठ)

श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया

पदभार/ पोर्टफोलिओदळणवळण मंत्री ; आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यगुना, मध्य प्रदेश
शैक्षणिक पात्रतास्टँडफोर्ड विद्यापीठातून 2001 मध्ये एमबीए ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस,
पालो अल्टो सीए, यूएसए

श्री भूपेंद्र यादव

पदभार/ पोर्टफोलिओपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्य
शैक्षणिक पात्रताबॅचलर ऑफ लॉ (LLB)-1993
गव्हर्नमेंट कॉलेज, अजमेर (अजमेर विद्यापीठ)

श्री गजेंद्रसिंह शेखावत

पदभार/ पोर्टफोलिओसांस्कृतिक मंत्री ;
आणि पर्यटन मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यजोधपूर, राजस्थान
शैक्षणिक पात्रता1989 मध्ये एमए
जोधपूर विद्यापीठ,
1987 मध्ये बी.एड.
जोधपूर विद्यापीठ

श्रीमती. अन्नपूर्णा देवी

पदभार/ पोर्टफोलिओमहिला व बालविकास मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यकोडरमा, झारखंड
शैक्षणिक पात्रतारांची विद्यापीठातून एम ए (इतिहास), ग्रॅज्युएट, मुबोधगया

श्री किरेन रिजिजू

पदभार/ पोर्टफोलिओसंसदीय कामकाज मंत्री
आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यअरुणाचल पश्चिम,
अरुणाचल प्रदेश
शैक्षणिक पात्रताकायदा पदवीधर (LL.B)
कॅम्पस लॉ सेंटर, विधी विद्या शाखा, दिल्ली विद्यापीठ

श्री हरदीप सिंग पुरी

पदभार/ पोर्टफोलिओपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यराज्यसभा
शैक्षणिक पात्रताएम ए (इतिहास), हिंदू कॉलेज, दिल्ली विद्यापीठ

डॉ. मनसुख मांडविया

पदभार/ पोर्टफोलिओकामगार आणि रोजगार मंत्री आणि
युवा कार्य आणि क्रीडा मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यपोरबंदर, गुजरात
शैक्षणिक पात्रताएम ए (राज्यशास्त्र),
भावनगर विद्यापीठ

श्री जी. किशन रेड्डी

पदभार/ पोर्टफोलिओकोळसा मंत्री ; आणि खाण मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यसिकंदराबाद, तेलंगणा
शैक्षणिक पात्रताCITD मधून टूल डिझाइनमध्ये डिप्लोमा

श्री चिराग पासवान

पदभार/ पोर्टफोलिओअन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
पक्षलोक जनशक्ती पार्टी
मतदार संघ व राज्यहाजीपूर, बिहार
शैक्षणिक पात्रतासंगणक अभियांत्रिकीची पदवी,
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, झाशी

श्री. सी. आर. पाटील

पदभार/ पोर्टफोलिओजलशक्ती मंत्री
पक्षभारतीय जनता पार्टी
मतदार संघ व राज्यनवसारी, गुजरात
शैक्षणिक पात्रताशालेय उत्तरोत्तर ITI, तांत्रिक प्रशिक्षण संस्था, सुरत

Leave a comment