भारतीय गाय 40 कोटींना विकली! जगातील सर्वात महाग विक्री झालेली गाय ठरली!

आपल्या आसपास आपण अनेक लोकांनी गायी-म्हशी किंवा शेळ्या-मेंढ्या पाळलेल्या बघतो. यांची जास्तीत जास्त किंमत किती असू शकते? फार फार तर लाखोंमध्ये. तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात महाग विक्री झालेली गाय ४० कोटींना विकली गेली आहे अन ती पण भारतीय वंशाची?

होय, हे खरं आहे! 2023 मध्ये ब्राझीलमध्ये ‘नेल्लोर’ नावाच्या गायीचा लिलाव 4.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ला झाला, 40 कोटी रुपयांना झाला. जी किंमत भारतीय रुपयांमध्ये जवळपास ४० कोटी रुपये इतकी आहे. ‘आरएम 38 मिस जुनो’ नावाची ही गाय ‘नेल्लोर’ या प्रसिद्ध गायीच्या वंशाची आहे.

“नेल्लोर” गाय काय आहे?

नेल्लोर गाय ही भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध गाय आहे. या गायींच्या दुधाची उत्पादनक्षमता जास्त असल्याने आणि त्यांचे दूध उत्तम प्रतीचे असल्याने त्यांना जगभरात पसंती मिळते. ‘नेल्लोर’ गायीची उंची जास्त असते आणि त्यांच्या शरीराचा रंग हलका तपकिरी असतो. गाय ४० कोटींना विकली गेलेली रेशमी पांढरी आणि खांद्यावर विशिष्ट कुबड असलेली ही गाय मूळची भारताची आहे.

गाय ४० कोटींना विकली! इतकी महाग का?

‘आरएम 38 मिस जुनो’ ही गाय अनेक पुरस्कार जिंकणारी गाय आहे. ती उत्तम प्रतीच्या वीर्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या वंशाची गायी मिळवण्यासाठी जगभरातील शेतकरी उत्सुक असतात.

या विक्रीमुळे काय फायदे झाले?

या विक्रीमुळे भारतातील ‘नेल्लोर’ गायीच्या वंशाची जगभरात मागणी वाढण्यास मदत झाली आहे. याचबरोबर, भारतीय शेतकऱ्यांना चांगल्या किंमतीला गाय विकण्याची संधी मिळेल.

‘आरएम 38 मिस जुनो’ ही जगातील सर्वात महाग विक्री झालेली गाय आहे. या विक्रीमुळे भारतीय शेतकऱ्यांना आणि ‘नेल्लोर’ गायीच्या वंशाला मोठा फायदा झाला आहे. आता भारतीय लोक देशी गायीच्या जातींच्या पालनाला प्राधान्य देतील.

भारतीय वंशाच्या गायी जगात डंका वाजवत असतांना भारतात अनेक विदेशी गायीच्या जाती पाळल्या जातात. यापैकी काही लोकप्रिय जाती खालीलप्रमाणे आहेत:

१) होल्स्टाईन-फ्रिझियन (Holstein Friesian) गाय :

होल्स्टाईन-फ्रिझियन गाय

ही जगातील सर्वात लोकप्रिय गायीची जात आहे. होल्स्टीन फ्रिजियन गाय हा एक युरोपियन गोवंश असून संकरित पशुधनासाठी हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. नेदरलँड्स आणि जर्मनी प्रजननकर्त्यांनी उत्कृष्ट गोवंश निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने ही जात विकसित केलेली आहे. होल्स्टेन-फ्रीजियन ही जगातील सर्वात व्यापक गुरांची जात आहे. हा गोवंश १५० पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतो. या गायी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतात आणि त्यांचे दूध उत्पादन जास्त असते.

२) जर्सी गाय (Jersey Cow) :

जर्सी गाय युरोपमध्ये जर्सी नावाचे एक बेट आहे, ज्याच्या नावावरून जर्सी गाय असे नाव पडले. ही ब्रिटीश पशु वंशातील गाय आहे.

या गायी च्या शरीराचा रंग लाल हलका पिवळा, तपकिरी शरीरावर लाल ठिपके असतो. टोकदार आणि दाट शरीर आणि कपाळ ताटाच्या आकाराचे असते. इतर सर्व जातींमध्ये ही सर्वात लहान जात आहे. या गायीचे दूध चरबीयुक्त आणि क्रीमयुक्त असते. या जातींसाठी थंड हवामान जास्त चांगले आहे. देशी गायींच्या तुलनेत अधिक दूध उत्पादन देणाऱ्या बॉश टॉरसच्या श्रेणीत या गायीचा समावेश करण्यात आला आहे.

३) ग्वेर्नसे गाय (Guernsey Cow):

ही गाय पिवळ्या रंगाची असते आणि ती चरबीयुक्त आणि क्रीमयुक्त दूध देते. दुग्धोत्पादनात ग्वेर्नसी गुरे अतिशय सौम्य मानली जातात. ही जात अनेक महत्त्वाचे गुणधर्म प्रदर्शित करते. या जातीच्या गायी दुधाचा दर्जा, वजन, रंग इत्यादी इतर जातीच्या जनावरांपेक्षा वेगळ्या असतात. याचे पालन केल्यास चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

४) आयरशायर गाय :

ही गाय लाल आणि पांढऱ्या रंगाची असते आणि ती चांगल्या प्रतीचे दूध देते. आयरशायर गायीच्या जातीचा उगम स्कॉटलंडमधील आयर येथून झाला असून या ठिकाणावरून आयरशायर गायीचे नाव पडले आहे. पहिल्या श्वेतक्रांती दरम्यान आयरशायर गायीची जात भारतात आणली गेली. तेव्हापासून भारतातही आयरशायर गायीची मागणी सातत्याने वाढत आहे.

आयरशायर गायीचे फायदे डेअरी उद्योगात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ही गाय साधारणपणे 20 ते 35 लिटर दूध देऊ शकते. चांगला आहार दिल्यास ही गाय एका दुग्धपानात 10 हजार लिटर दूध देऊ शकते. याशिवाय आयरशायर गाईची रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असून ही गाय सहजासहजी आजारी पडत नाही. त्याच वेळी, ते 0 अंश ते 45 अंश तापमानात सहज टिकून राहू शकतात आणि तापमानाचा आयरशायरच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होत नाही. यासोबतच आयरशायर गाईच्या देखभालीसाठीही फारसा खर्च येत नाही.

५) ब्राऊन स्विस गाय :

ब्राऊन स्विस गाय जी मूळची स्वित्झर्लंडची आहे. ही जगातील सर्वात जुन्या गायीच्या जातींपैकी एक मानली जाते. ही गाय तपकिरी रंगाची असते आणि ती मजबूत आणि निरोगी असते.

ब्राऊन स्विस गाय ही एक जात आहे जी भारतात फार कमी ठिकाणी आढळते परंतु पशुपालक ज्यांना तिचे वैशिष्ट्य माहित आहे ते कोणत्याही किंमतीला विकत घेण्यास तयार असतात. मुळात डोंगराळ भाग असलेल्या थंड हवामान या साठी अधिक अनुकूल मानले जाते. ही जात दूध उत्पादन क्षमतेसाठी पशुपालकांमध्ये खूप लोकप्रिय मानली जाते. या जातीची एका दिवसात 20-25 लिटर दूध देण्याची क्षमता आहे.

ब्राऊन स्विस ही जात स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगातील आहे. या जातीची उंची मध्यम आहे. हे फिक्क्या पासून गडद रंगापर्यंत वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. यातून चांगल्या प्रतीची वासरे तयार होतात. या जातीच्या बैलाचे सरासरी वजन 590-635 किलो आणि गायीचे वजन 900 किलो असते.

६) सिमेंटल गाय :

सिमेंटल गाय पांढऱ्या आणि तपकिरी रंगाची असते. ही गाय चांगले स्नायू, लांब आणि मजबूत हाडे असलेले शरीरअसलेली जात आहे. त्यांचा स्वभाव चांगला आणि दूध उत्पादन जास्त असून ती चांगल्या प्रतीचे दूध देते. सिमेंटल इतर युरोपियन जातींपेक्षा लक्षणीयरीत्या जड असतात.

७) रेड डेन गाय :

या गायींचं मूळ स्थान डेनमार्क देश आहे. ही गाय लाल रंगाची असते आणि ती चांगल्या प्रतीचे दूध देते.

या जातीच्या जनावरांचे वजन मध्यम ते जड असते. त्याच्या शरीराचा रंग गडद लाल आहे. ही जात प्रति वेत 4500-5500 किलो दूध देते आणि तिच्या दुधात फॅटचे प्रमाण 4 टक्के असते. या जातीच्या बैलाचे सरासरी वजन 1000 किलो आणि गायीचे 660 किलो असते.

रेड डेन गाय

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana): कारागिरांसाठी दुवा

Trending News Nation

Leave a comment