महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी 2024 ही परीक्षा बीसीए, बीबीए आणि बीएमएस या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणार आहे. यात एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड हे दोन नवीन अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 सीईटी साठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची भरण्यास शेवटची तारीख 30 एप्रिल आहे.
सीईटी 2024 विषयी महत्वाचे मुद्दे:
- अर्ज नोंदणी: ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया २१ मार्च २०२४ रोजी सुरू झाली आणि ३० एप्रिल २०२४ पर्यंत चालू राहणार आहे.
- परीक्षा तारखा: महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ आणि एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड परीक्षा २७ ते २९ मे २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहे.
- अभ्यासक्रम आणि माहितीपत्रक: महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ परीक्षेसाठीचे अभ्यासक्रम आणि माहितीपत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यात एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड यांचाही समावेश आहे.
- महत्वाची सूचना: उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड मध्ये प्रवेश घेण्यासाठी महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी 2024 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: