मारुती सुझुकी चे 3 कोटी वाहन उत्पादन! हा टप्पा गाठणारी एकमेव भारतीय कंपनी

मारुती सुझुकी भारतात झंकार देत आहे! कंपनीने एक मोठी उपलब्धी नोंदवली असून भारतातील त्यांच्या कारखान्यांनी सर्वात जलद गतीने 3 कोटी (30 दशलक्ष) वाहनांचे उत्पादन केले आहे. ही एक खास गोष्ट म्हणजे, ही कामगिरी सुझुकी मोटर कॉर्पच्या सर्व उत्पादन केंद्रांमध्ये सर्वात वेगवान आहे आणि फक्त 40 वर्षे 4 महिन्यांत हा विक्रम गाठला आहे. याबद्दलची माहिती मारुती सुझुकी कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. अशी कामगिरी करणारी मारुती सुजूकी भारतातील एकमेव कंपनी आहे.

मारुती सुझुकी विषयी महत्त्वाची माहिती:

  • ही 3 कोटी वाहने कंपनीच्या तीन उत्पादन केंद्रांमध्ये बनली आहेत – गुरुग्राम, मानेसर (हरियाणा) आणि हंसलपूर (गुजरात).
  • वाहन व्यवसायात legend असलेल्या या कंपनीने आपल्या प्रवासाला 1983 मध्ये मारुती 800 पासून सुरुवात केली.
  • आज, कंपनी 18 वेगवेगळी मॉडेल्स बनवते आणि जवळपास 100 देशांना निर्यात करते.

वाहन उद्योगात ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. Maruti Suzuki ची भारतातील कामगिरी सुरुवातीपासूनच यशस्वी ठरली आहे. 1983 मध्ये देशातील रस्त्यावर पहिली मारुती 800 उतरल्यापासून कंपनीने मागे पाहिले नाही. स्वस्त, टिकाऊ आणि इंधन कार्यक्षमतेमुळे मारुती 800 भारतीयांची आवडती बनली.

मारुती सुझुकी कार

आज मारुती सुझुकी भारतातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय मॉडेल्स लाँच केल्या आहेत जसे की अल्टो, स्विफ्ट, वॅगनर, डिजायर, ब्रेझा आणि अर्टिगा. कंपनी आता SUV आणि प्रीमियम हॅचबॅकवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे.

3 कोटी वाहनांचे उत्पादन ही फक्त एक संख्या नाही तर भारतातील ऑटोमोबाईल उद्योगातील प्रगतीचे आणि मारुती सुझुकीच्या यशस्वी वाटचालीचे ही प्रतीक आहे.

टेस्लाचा 60 लाख कार उत्पादनाचा टप्पा पार! इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात क्रांती !

Leave a comment