भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटच्या 50 किलो वजनी गटातील अयोग्यता प्रकरणाचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने (CAS) पॅरिस ऑलिम्पिक 2024 संपल्यानंतर म्हणजेच 13 ऑगस्ट (मंगळवार) पर्यंत राखून ठेवला आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
विनेश फोगाटची कामगिरी आणि अयोग्यता
विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. तथापि, अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टात अपील दाखल केले होते, जे स्वीकारण्यात आले आहे. केंद्र सरकारने विनेशची बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे.
CAS द्वारे विचारलेले प्रश्न
CAS ने अद्याप निर्णय घेतलेला नाही, परंतु त्यांनी विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. हे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
- वजन नियमाची जाणीव: विनेशला विचारले आहे की, तिला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का?
- रौप्य पदकाबाबत: क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्य पदक शेअर करेल का?
- निर्णयाची सार्वजनिकता: तुम्हाला या अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे?
विनेश फोगाटला जागतिक पाठिंबा
विनेश ला जगभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेचा सहावेळा जगज्जेतेपद विजेता कुस्तीपटू जॉर्डन बुरोज याने विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. जपानचा सुवर्णपदक विजेता रेई हिंगुची यानेही विनेशचे दुःख समजू शकतो असे म्हटले आहे. भारतातही भालाफेकपटू नीरज चोप्रा, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी विनेशला पाठिंबा दर्शविला आहे.
CAS चे कार्य
ऑलिम्पिक 1896 मध्ये ग्रीसमध्ये खेळवले गेले होते. यानंतर काही वर्षांनी वाद निर्माण झाले आणि काही खेळाडूंनी नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले. या वादांवर निर्णय घेण्यासाठी ‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स’ ची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि ही संस्था पूर्णपणे स्वायत्त असून निर्णय स्वतंत्रपणे घेत असते.
विनेश फोगाट प्रकरणाचा अंतिम निकाल काय येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे, आणि त्यांच्या चाहत्यांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
विनेश फोगाटच्या CAS मधील दोन अपील: एक फेटाळले, दुसरे स्वीकारले
विनेश फोगाट अपीलसाठी 4 फ्रेंच वकील विनामूल्य प्रतिनिधित्व करणार, IOA साठी बाजू हरीश साळवे मांडतील
Paris Olympics 2024: विनेश फोगाट च्या पदकाच्या आशा पल्लवित
Paris Olympics 2024: विनेश फोगाटला कुस्तीमधून डिसक्वालिफाय का करण्यात आले?