Hero MotoCorp ची धमाकेदार बाईक – माव्हरिक 440 (The Hero MotoCorp Maverick 440 – A Powerful Machine) भारतीय रस्त्यावर धूमाकूळ घालण्यासाठी सज्ज! भारतात बहुचर्चित Hero MotoCorp च्या माव्हरिक 440 ची ग्राहक वितरण आज 15 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे.
Maverick 440 वितरण सुरू:
हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनी स्वतः ग्रुरुग्राममधील हीरो प्रीमिया आउटलेट आणि डीएलएफ सायबर हब येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये तीन भाग्यशाली ग्राहकांना चावी देऊन वितरणाची सुरुवात केली. आजपासून संपूर्ण भारतात माव्हरिक 440 बाईक उपलब्ध झाली आहे.
हिरो मोटोकॉर्पची ही नवीन प्रीमियम मोटारसायकल लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये जबरदस्त उत्साह होता. कंपनीने आज पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात केली आहे. या प्रसंगी डॉ. मुंजाल यांनी स्वतः ग्राहकांना चावी दिल्याने हा सोहळा अधिकच विशेष झाला.
या 440cc च्या मजबूत आणि स्टायलिश बाईकची चर्चा फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली होती. आकर्षक डिझाईन, ताकदवान इंजिन आणि अत्याधुनिक फीचर्स यामुळे ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि जावा 350 या मिड-वेट चॅम्पियन्स ला टक्कर देण्यास सक्षम आहे.
Maverick 440 ची काही वैशिष्ट्ये:
- 440 सीसी एयर-ऑइल कूल्ड इंजिन – 27 bhp पॉवर आणि 36 Nm टॉर्क जनरेट करते.
- 6-स्पीड गिअरबॉक्स सहज आणि आरामद राइडसाठी.
- ड्युअल चॅनल एबीएस – सुरक्षित ब्रेकिंगसाठी.
- ट्रेलिस फ्रेम आणि टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मोनोशॉक सस्पेन्शन – उत्तम हँडलिंगसाठी.
- 3 variants – बेस, मिड आणि टॉप – तुमच्या बजेट आणि गरजेनुसार निवडण्यासाठी.
- बेस व्हेरियंटची किंमत 1.99 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 2.24 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम).
- महत्त्वाची माहिती अशी आहे की, 15 मार्च 2024पूर्वी बुकिंग करणाऱ्या पहिल्या टप्प्यातील ग्राहकांना कंपनीकडून ₹10,000/- ची मोफत ॲक्सेसरीज आणि मर्चेंडाइज मिळणार आहे.
माव्हरिक 440 बद्दल अधिक जाणून घ्या आणि टेस्ट राइड करा!
Hero MotoCorp ची अधिकृत वेबसाइट Hero MotoCorp website: https://www.heromotocorp.com/en-in.html किंवा तुमच्या जवळील Hero Premia डीलरशिपला भेट द्या. मावरिक 440 ची टेस्ट राइड घ्या आणि या जबरदस्त बाईकचा अनुभव घ्या!