RTE 25% Admission: महाराष्ट्रात RTE साठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने आरटीई (Right to Education) कायद्यानुसार सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये २५% जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% Admission ऑनलाईन अर्ज १६ एप्रिल पासून ३० एप्रिल २०२४ पर्यंत स्वीकारले जातील.

पात्र मुलांसाठी ही उत्तम संधी आहे!

RTE 25% Admission: कोण अर्ज करू शकतो?

  • ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुले (बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकर अधिनियम २००९ मधील तरतूदींनुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ६+ गृहित धरताना मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेली आहे.)
  • ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाख पेक्षा कमी आहे
  • वंचित, दुर्बलवर्गीय आणि गरजू मुले
RTE 25% Admission

RTE 25% Admission: अर्ज कसा करावा?

  • शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://student.maharashtra.gov.in/
  • RTE 25% Admission वरती क्लिक करा.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.

RTE 25% Admission: महत्वाचे टप्पे:

  • १६ एप्रिल २०२४: ऑनलाईन अर्ज सुरू
  • ३० एप्रिल २०२४: ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख
  • मे २०२४: लॉटरी आणि प्रवेश यादी जाहीर
  • जून २०२४: प्रवेश प्रक्रिया पूर्ण

RTE 25% Admission: पालकांकरीता सूचना (2024-2025)

  1. आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
  2. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
  3. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
  4. १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
  5. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
  6. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
  7. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
  8. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
  9. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
  10. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
  11. RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.
  12. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  13. सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
  14. सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  15. अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@gmail.com OR educom-mah@mah.gov.in वर इमेल पाठवावा.

RTE 25% Admission: अधिक माहितीसाठी:

टीप:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • चुकीची किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज रद्द केले जातील.
  • प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही शंका असल्यास, शिक्षण विभागाशी संपर्क साधा.

आजच अर्ज करा आणि आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षणाची संधी द्या!

RTE Admission आरटीई प्रवेश प्रक्रिया: 25% प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मोठा बदल?

RTE अंतर्गत केंद्रीय विद्यालयात देखील ॲडमिशन होतात. तुमच्या जवळ केंद्रीय विद्यालय आहे का नाही ते इथे बघा.

Leave a comment