श्री अष्टविनायक दर्शन (Shri Ashtavinayak Darshan)

श्री गणेशाचं (Lord Ganesha) स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. गणपती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची रूपं भुरळ घालतात. संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती पाहायला मिळतात. इतकंच नाही तर भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची मंदिरं आहेत. मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे. त्यांना अष्टविनायक म्हणतात. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत. मुद्गल पुराणात तसंच इतर काही पुराणांत मंदिरांचे उल्लेख आढळतात. आठही गणपती स्वयंभू आहेत. या अष्टविनायक गणेशावर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे.

१) पहिला अष्टविनायक श्री मयूरेश्वर (मोरगाव) [Mayureshwar (Morgaon)]:

अष्टविनायक
श्री
मयूरेश्वर

अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावला असलेला मयूरेश्वर हा आहे. मयूरेश्वर हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. त्याचमुळे याचं नाव मयूरेश्वर असं पडलं. गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत. डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे.

नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं तर मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे, हे इथलं वैशिष्ट्य आहे. मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीकं मानली जातात. 

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर रिद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे,पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत

मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

मयूरेश्वर (मोरगाव) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

२) अष्टविनायक श्री सिद्धिविनायक (सिध्दटेक) [Siddhivinayak (Siddhatek)]:

श्री सिद्धिविनायक (सिध्दटेक): सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिध्दटेकहून  सिद्धटेक इथं आहे. हा अष्टविनायकातील दुसरा गणपती. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.

अष्टविनायक
श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती 3 फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते. पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली असतो, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे.  हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे गणेशाची सोंड उजवीकडे आहे. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे.

मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते, त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता- ब्रह्मदेव याच कमळातून उदयास आले. ब्रह्म देवाने विश्वाची निर्मिती सुरू केली असतांनाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले. समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे, पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत.

मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला “ओम श्री गणेशाय नमः” मंत्राने प्रसन्न केले. प्रसन्न झाल्यावर , श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी /शक्ती प्राप्त करून दिल्या. हे मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते.

विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे.

परंपरेने, उजव्या सोंडेच्या गणरायाचे नाव “सिद्धी-विनायक” असे ठेवले जाते. सिद्धी देणारा (“सिद्धी, यश”, “अलौकिक शक्ती”). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते. हे स्थान अत्यंत शक्तिशाली असल्याचे मानले जाते. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती.

श्री सिद्धिविनायक (सिध्दटेक) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

३) तिसरा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर (पाली) [Ballhaleshwar (Pali)]:

श्री बल्लाळेश्वर (पाली): रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं.

तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिलं. पुढे अनेक वर्षं या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं. तोच हा पालीचा बल्लाळेश्वर. 

अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर

हे मूळ लाकडी मंदिर ‘श्री फडणीस’ यांनी डिझाइन केलेले आहे. आणि ‘1760’ मध्ये विकसित केलेल्या नवीन दगडी मंदिराचा मार्ग बनवण्यासाठी नूतनीकरण करण्यात आले. श्री अक्षराच्या आकारात तयार केले आणि बांधकामा दरम्यान सिमेंटमध्ये शिसे मिसळून तयार केले गेले. पूर्वाभिमुख मंदिर काळजीपूर्वक बांधले होते जेणेकरून, सूर्योदय होताना, सूर्याची किरणे पूजा करताना थेट गणेशमूर्तीवर पडतात. या मंदिरात एक घंटा आहे जी ‘चिमाजी आप्पा पेशव्यांनी’ ‘वसई’ आणि ‘सस्ती’ येथे ‘पोर्तुगीजांचा’ पराभव केल्यानंतर परत आणली होती.

श्री बल्लाळेश्वर (पाली) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

४) चौथा अष्टविनायक श्री वरदविनायक (महड) [Varadvinayak (Mahad)]:

अष्टविनायक
श्री वरदविनायक

श्री वरदविनायक (महडरायगड जिल्ह्यातल्याच महड गावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितलं जातं. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती दिसतात. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. वरदविनायक महड गणपती मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती असून मंदिराला प्रत्यक्षात मठ म्हणून मान्यता आहे.

मंदिराची रचना अतिशय सोप्या पद्धतीने टाइल केलेले छत, सोन्याचा कळस असलेला 25 फूट उंचीचा घुमट आहे. कोरीवकाम असलेले मंदिर 8 फूट लांब आणि 8 फूट रुंद आहे. हे अष्ट विनायक मंदिर पूर्वाभिमुख असून श्रींची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून सोंड डावीकडे वळलेल्या आहे. मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत. 

मंदिराच्या उत्तरेला असलेल्या गोमुखातून पवित्र पाणी वाहते. मंदिराच्या पश्चिमेला एक पवित्र तलाव आहे. या मंदिरात मुशिका, नवग्रह देवता आणि शिवलिंगाची मूर्ती देखील आहे.

वरदविनायकाची मूळ मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेर दिसते. मूर्तीची अवस्था अत्यंत वाईट असल्याने मंदिर विश्वस्तांनी मूर्तीचे विसर्जन करून त्या ठिकाणी नवीन मूर्तीचे अभिषेक केले. मात्र, विश्वस्तांच्या या निर्णयाला काही लोकांनी आक्षेप घेत जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. आता दोन मूर्ती पाहावयास मिळतात, एक गर्भगृहाच्या आत आणि एक गर्भगृहाबाहेर. गर्भगृह दगडाचे बनलेले आहे आणि त्याच्याभोवती सुंदर नक्षीकाम केलेले दगडी हत्ती कोरलेले आहे, ज्यामध्ये मूर्ती ठेवली आहे. शुध्द पक्षाच्या पहिल्या दिवसापासून भाद्रपद महिन्यातील पंचमीपर्यंत आणि माघ महिन्यातील शुद्ध ते पंचमीपर्यंत या मंदिरात प्रमुख सण साजरे केले जातात.

श्री वरदविनायक (महड) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

५) पाचवा अष्टविनायक श्री चिंतामणी (थेऊर) [Chintamani (Theur)]:

श्री चिंतामणी (थेऊर): पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे. मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून, पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेचा हा गणपती असून, त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत. मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणं फेडतं. सर्व चिंता नष्ट करणारा, विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो. माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं. रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे.

अष्टविनायक श्री चिंतामणी

श्री मुद्गल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लम्बोदरांचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजीअप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजां कडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्रीचिंतामणींच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षीनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले. त्या स्थानी कदंब वृक्ष नावाने आजही भव्य वृक्ष पाहायला मिळतो.

मंदिरात तीन मुख्य उत्सव साजरे केले जातात. गणेश चतुर्थी उत्सवाशी संबंधित असलेला गणेश प्रकटोस्तव. हा सण भाद्रपद (भाद्रपत) या हिंदू महिन्याच्या पहिल्या ते सातव्या दिवसापर्यंत साजरा केला जातो, जिथे गणेश चतुर्थी हा चौथा दिवस असतो. या कार्यक्रमात जत्रा भरते. माघोत्सव हा कार्यक्रम भगवान गणेशाच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो – गणेश जयंती, जी माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी येते.

भीमा, मुळा आणि मुठा या तीन प्रमुख प्रादेशिक नद्यांच्या संगमावर थेऊर हे एक महत्त्वाचे पौराणिक ठिकाण आहे. चिंतामणी गणेशाच्या रूपात भगवान गणेश हा मनःशांती आणणारा आणि मनातील सर्व गोंधळ दूर करणारा देव आहे.

श्री चिंतामणी (थेऊर) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊर पासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले  निसर्गोपचार केंद्र आहे.)

६) सहावा अष्टविनायक श्री गिरीजात्मज (लेण्याद्री) [Girijatmak (Lenyadri)]:

अष्टविनायक श्री गिरीजात्मज (लेण्याद्री)

श्री गिरीजात्मज (लेण्याद्री ): पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री  गिरीजात्मजाचं मंदिर आहे. डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसंच हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलंय. गिरीजा हे देवी पार्वतीचं नाव असून, तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे. एका मोठ्या टेकडीतून हे मंदिर कोरलेलं आहे. या डोंगरात 18 बौद्धगुहा आहेत. त्यापैकी आठव्या गुहेत गिरीजात्मजाचं मंदिर आहे. मंदिरात विजेचा बल्ब नाही. मंदिराचे बांधकाम असे आहे की दिवसा ते नेहमी सूर्यकिरणांनी उजळलेले असते!

हे मंदिर एका दगडी टेकडीतून कोरलेले आहे, ज्याला 307-315 पायऱ्या आहेत. 307 – 315 पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर येते, डोंगरावरील 18 बौद्ध लेण्यांपैकी गिरिजात्मज गणपती मंदिर आठव्या गुहेत आहे. त्यांना गणेश-लेणी असेही म्हणतात. ही गुहा प्रत्येक हवामानात अतिशय थंड असते. आणि हे मंदिर/लेणी अतिशय स्वच्छ आहेत. गुहांच्या बाहेर डोंगरावरून पडणारे थंडगार पाणी. त्यामुळे अनेक माकडे लोकांसोबत खेळतात आणि मजा करतात. पावसाळ्यानंतर लेणी अतिशय सुंदर आणि हिरवेगार डोंगर दिसतात. मंदिराला आधार देणारे खांब नसलेले विस्तीर्ण सभामंडप आहे. मंदिराचा सभामंडप ५३ फूट लांब, ५१ फूट रुंद आणि ७ फूट उंचीचा आहे.

लेण्याद्री हे कुकडी नदीच्या वायव्य तीरावर वसलेले आहे. ‘लेन्याद्री’ या सध्याच्या नावाचा अर्थ ‘डोंगरातील गुहा’ असा होतो. मराठीतील ‘लेना’ म्हणजे ‘गुहा’ आणि संस्कृतमध्ये ‘आद्री’ म्हणजे ‘डोंगर’ किंवा ‘दगड’ यावरून त्याची व्युत्पत्ती झाली आहे. ‘लेन्याद्री’ हे नाव हिंदू धर्मग्रंथ गणेश पुराणात तसेच स्थल पुराणात गणेशाच्या आख्यायिकेशी संबंधित आढळते. त्याला जीरापूर आणि लेख पर्वत (‘लेखन पर्वत’) असेही म्हणतात.

श्री गिरीजात्मज (लेण्याद्री) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

लेण्याद्री चा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

७) सातवा अष्टविनायक श्री विघ्नेश्वर (ओझर) [Vighneshwar (Ozar)]:

श्री विघ्नेश्वर (Vighneshwar) (ओझर): अष्टविनायकातील हा सातवा गणपती. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे. या ठिकाणी गणपतीनं विघ्नासुर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर, विघ्नहर्ता असं नाव पडलं, अशी एक आख्यायिका आहे.

श्री विघ्नेश्वर, ओझर

गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गणेश जयंतीच्या वेळी मंदिर फुलांनी आणि रोषणाईने सजवले जाते. गणेश जयंतीला लाखो लोक गणेश दर्शनासाठी येथे येत असतात. याशिवाय, कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणारा पाच दिवसांचा उत्सवही दीपमाळांना प्रज्वलित करून साजरा केला जातो. कार्यक्रम किंवा गणेश जयंतीच्या दिवसात, खरेदीसाठी आणि गणेशाच्या गोड प्रसादासाठी येथे बरीच छोटी दुकाने असतात.

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थी’ आणि ‘माघ शुद्ध चतुर्थी’ हे पवित्र सोहळे सर्व गाव, शहरे आणि इतर भागातील लोक एकत्र येऊन थाटामाटात साजरे करतात. त्या काळात एक सुंदर लाइटनिंग (दीप माळ) व्यवस्था आहे. बैलपोळा (बैलांचा सण) हा सण देखील अशाच पद्धतीने साजरा केला जातो ज्यामध्ये लिलावात सर्वात जास्त बोली लावलेल्या व्यक्तीच्या बैलांना पारंपारिक मानाचे स्थान दिले जाते.

ओझर हे गाव कुकडी नदीच्या काठावर बांधलेल्या येडगाव धरणाजवळ आहे. हे गणेश मंदिर भारतातील महाराष्ट्र राज्यातील गणेशाच्या आठ पूज्य तीर्थांपैकी अष्टविनायक यात्रेपैकी एक आहे.

श्री विघ्नेश्वर (ओझर) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

ओझर हे पुणे शहरापासून सुमारे 85 किमी अंतरावर, पुणे-नाशिक महामार्गापासून (NH 60 महामार्ग) आणि नारायणगावच्या उत्तरेस सुमारे 9 किमी अंतरावर आहे. ओझर ते नाशिक (नासिक) हे अंतर नाशिक-पुणे NH60 महामार्गाने 145 किमी आहे.

८) आठवा अष्टविनायक श्री महागणपती (रांजणगाव) [Mahaganpati (Ranjangaon)]:

श्री महागणपती Mahaganpati (रांजणगाव): पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे. गणेशाचं सर्वांत शक्तिशाली, प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धीदेखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं.

या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्याऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.

त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, “यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने “प्रणम्य शिरसा देवम्‌’ या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला “त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.

श्री महागणपती (रांजणगाव) मुख्य शहरापासून किती अंतरावर आहे?

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे): पुणे– अहमदनगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र पुण्यापासून ५० किलोमीटर आहे. शिरूरपासून २१ किलोमीटर तर  अहमदनगर पासुन ७० किलोमीटर आहे.

अहमदनगर, शिरूरआणि पुणेहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे, तसेच अहमदनगर मार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे. या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे, तसंच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत. भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात. तसेच महाराष्ट्रात गणरायाचा सर्वांत मोठा उत्सव असतो.

Trending News Nation.com

माघी गणेश जयंती तारीख, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ कधी? Maghi Ganesh Jayanti 2024:

Leave a comment