मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्रातील महिलांसाठी 1 महत्त्वपूर्ण पाऊल

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सशक्तीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक, आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांमध्ये मदत केली जाईल. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेच्या उद्दिष्टे, स्वरूप, लाभ, पात्रता आणि अपात्रतेविषयी सविस्तर माहिती पाहू.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रस्तावना

महाराष्ट्रातील महिलांचे रोजगाराचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रातील पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% आहे, तर स्त्रियांची केवळ 28.70%. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना याचाच एक भाग आहे, ज्याद्वारे महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवले जाईल.

याच प्रकारची योजना मध्यप्रदेश मध्ये फार लोकप्रिय ठरली होती. सदर योजनेची सफलता बघून महाराष्ट्र शासनाने ही योजना महाराष्ट्र राज्यात लागू करण्याचा निर्णय घेऊन तात्काळ लागू केली आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश

  1. महिला व मुलींसाठी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे: रोजगाराच्या संधी निर्माण करून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मदत करणे.
  2. सामाजिक पुनर्वसन: महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे.
  3. स्वावलंबन: महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे.
  4. सशक्तीकरण: राज्यातील महिला व मुलींना सशक्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  5. आरोग्य व पोषण सुधारणा: महिलांच्या आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप

योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. जर कोणती महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनांद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल, तर फरकाची रक्कम दिली जाईल.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी

या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील विवाहिता, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना मिळेल.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता निकष

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा अधिक आहे.
  • कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • कुटुंबातील सदस्य खासदार/आमदार असल्यास.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. महाराष्ट्र राज्यातील रहिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
  3. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  4. बँक खाते पासबुकची प्रत
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. रेशनकार्ड
  7. अटींचे पालन करण्याचे हमीपत्र

लाभ प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जाची तपासणी अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत किंवा अन्य अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल. योजनेच्या लाभार्थ्यांना निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येईल.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा:-
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना कालावधी

लाभार्थी निवड

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे ठरवले आहे. सक्षम अधिकारी हे या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहे.

अ.क्र.कार्यक्षेत्रलाभार्थ्यांची स्वीकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करणे.अर्ज अर्ज पडताळणी करुन सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादरअंतिम मंजूरी
1ग्रामीण भागअंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका/ सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवकसंबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीसंबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती
2नागरी भागअंगणवाडी सेविका/ मुख्यसेविका/ वार्ड अधिकारी/ सेतू सुविधा केंद्रसंबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीसंबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे नियंत्रण अधिकारी :-

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी “नियंत्रण अधिकारी” आहेत. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे “सहनियंत्रण अधिकारी” आहेत.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे. या योजनेद्वारे महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. या योजनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे, ज्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल.

सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच राज्यातील महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

अधिक माहितीसाठी:

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्या.

महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन

संबंधित:-

तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग: 10 लक्षणे, कारणे, निदान आणि प्रतिबंधक उपाय

Leave a comment