खुशखबर: ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नारीशक्ती दूत ॲप आलं; ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहेत.

ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात. तसेच नवीन संकेतस्थळ देखील विकसित केले आहे, त्याव्दारे ही फाॅर्म भरता येणार आहेत.

ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करन्यायाचा पर्याय दिलेला आहे. अंगणवाडी सेविका नंतर तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन ‘Narishakti Doot’ नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ॲप्लिकेशन Install केल्यावर खालील प्रमाणे प्रक्रिया करा:

  1. ॲप्लिकेशन उघडा: Narishakti Doot ॲप्लिकेशन उघडल्यानंतर, मुख्य पृष्ठावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा.
  2. नोंदणी करा: तुमचं मोबाईल क्रमांक वापरून ॲप्लिकेशनवर नोंदणी करा. नोंदणी करताना तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल, तो OTP योग्य ठिकाणी प्रविष्ट करा.
  3. प्रोफाईल पूर्ण करा: तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. जसे की, तुमचं नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, पत्ता इत्यादी.

सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकावा.

पुढे अर्जदाराचा पत्ता, जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे.
मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकावा.

शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करावी.

पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडावा

अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकावा.

यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकावा.

आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडावं.

आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यावा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा: योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करा. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश होतो.

येथे तूम्हाला खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत:-

आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.


उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.


अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.


बँक पासबुक


अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे.

Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करावं.

त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती काळजीपूर्वक वाचून “फॉर्म सबमिट करा” या पर्यायावर क्लिक करावं.

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल.
मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल.
तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल.
जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.

अशाप्रकारे तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज सबमिट करा: सगळी माहिती आणि कागदपत्रे भरण्यानंतर, तुमचा अर्ज सबमिट करा. सबमिट केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक (Reference Number) मिळेल. हा क्रमांक तुमच्या अर्जाच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी उपयोगी ठरेल.

अर्जाची स्थिती तपासा: तुमचा अर्ज सबमिट केल्यावर, ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. यासाठी संदर्भ क्रमांक वापरा.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

फाॅर्मसाठी नवीन संकेतस्थळ विकसित:

मोबाईल ॲप्लीकेशन मधून अर्ज भरताना महिलांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हीच अडचण लक्षात घेता सरकारने आता या योजनेसाठी एक नवीन संकेतस्थळ विकसित केले आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून देखील आता महिलांना अर्ज भरता येत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे फायदे

  • सुविधा: घरबसल्या अर्ज दाखल करण्याची सोय.
  • वेळ वाचवणे: अंगणवाडी किंवा सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही.
  • त्वरित अपडेट्स: अर्जाच्या स्थितीबद्दल त्वरित माहिती मिळू शकते.
  • डिजिटल सेवांचा लाभ: कागदपत्रांची सुरक्षितता आणि ऑनलाईन प्रक्रिया.

या सोप्या आणि सहज प्रक्रियेद्वारे तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.

संबंधित:-

Narishakti Doot ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्रातील महिलांसाठी 1 महत्त्वपूर्ण पाऊल

Leave a comment