Paris Olympics 2024: नीरज चोप्राने जिंकले रौप्यपदक!

Paris Olympics 2024: भारताचा अभिमान नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्यपदक जिंकून आपल्या ऑलिम्पिक पदक संग्रहात आणखी एक पदक जोडले आहे. त्याने 89.45 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह हे यश मिळवले आहे.

Paris Olympics 2024: नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकले:

नीरजने या यशासह नॉर्मन प्रिचर्डनंतर (1900) ट्रॅक अँड फील्डमध्ये दोन पदके जिंकणारा दुसरा भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. टोकियो 2020 मधील सुवर्णपदक विजेत्या कामगिरीला कायम ठेवण्यासाठी त्याने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य आहे. आतापर्यंत भारतीय टिमने तीन ब्रांझ आणि हे सिल्व्हर असे एकूण चार पदकं जिंकली आहेत. यासह नीरज हा सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ सुशील कुमारला सलग 2 ऑलिम्पिक (2008 आणि 2012) मध्ये पदक जिंकता आले होते.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक रेकॉर्ड करत सुवर्णपदक जिंकले. त्याने रेकॉर्डब्रेक 92.97 मीटर भाला फेकला, जो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोच्च आहे. तर त्याचवेळी ग्रेनाडाचा अँडरसन ला कांस्यपदकावर समाधानी रहावे लागले. पीटरला ८८.५४ मीटरपर्यंतच मजल मारता आली. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरसह सुवर्णपदक पटकावले होते.

नीरज चोपरा च्या या कामगिरीने संपूर्ण भारताला गर्व वाटतो आहे. संपूर्ण देशभरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांसह अनेकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. त्याने आपल्या अथक प्रयत्नांनी आणि अविरत मेहनतीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो खरंच ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) आहे. चला, आपण सर्वजण आपल्या या हिरोचे अभिनंदन करूया आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया!

पंतप्रधानांनी दिल्या नीरज चोप्राला शुभेच्छा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोपरा च्या रौप्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले की, “नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचा अवतार! त्याने वेळोवेळी आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. त्याने आणखी एक ऑलिम्पिक यश संपादन केल्याने भारत आनंदित झाला आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. तो असंख्य नवोदित खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या देशाचा अभिमान वाढवत राहील.”

भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरज चोपरा सह 12 खेळाडू होते. सर्व खेळाडूंना 6-6 थ्रो करण्याची संधी मिळाली. सर्वाधिक लांब थ्रो करणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक मिळते. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोपरा ने 89.34 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलेला होता. मात्र, यावेळी पाकिस्तानच्या अरशद नदीमने 92.97 मीटर भाला फेकून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

पाकिस्तान पदक तालिकेत फक्त या एका सुवर्ण पदकासह 53 व्या स्थानावर गेला आहे. तर नीरजच्या रौप्यपदकानंतरही भारत 5 पदकांसह 63 व्या स्थानी आला आहे. भारताने आतापर्यंत भालाफेक मध्ये एक सिल्वर, पुरूष हाॅकी चे एक ब्रांझ तर शूटिंग मधील तीन ब्रांझ असे एकूण पाच पदकं जिंकली आहेत.

संबंधित:-

Paris Olympics 2024: नीरज चोप्राची शानदार कामगिरी; गुरुवारी फायनल खेळणार !

Paris Olympics 2024: हॉकीमध्ये भारताचा जर्मनीविरुद्ध ३-२ ने पराभव; कांस्यपदकासाठी लढणार

Leave a comment