इलॉन मस्कने यूट्यूबशी स्पर्धा करण्यासाठी X App; एक्स (X) चे टीव्ही ॲप लाँच केले आहे. आता YouTube ची असलेली जागतिक बाजारपेठेतील मक्तेदारी संपणार आहे. असे असले तरी ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. जगातील सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये बाय डीफॉल्ट YouTube ॲप मिळेल. याचे मुख्य कारण म्हणजे इतर अनेक स्पर्धक बाजारात आले अन गेले ही परंतु गुगलचे टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर वर्चस्व कायमच राहिले आहे.
X App: एक्स (X) चे टीव्ही ॲप:
एक्स (X)चे TV ॲप लवकरच लॉन्च होणार आहे. खुद्द एक्सचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ही माहिती दिली आहे. X वरती म्हणजेच पूर्वाश्रमीचे Twitter वरती दिली आहे. यासाठी इलॉन मस्कने X TV ॲपसाठी दोन मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. एक्स (X) आता यूट्यूबशी स्पर्धा करणार आहे. X TV ॲपचे अपडेट पुढील आठवड्यापासून प्रसिद्ध होणार आहे.
रिपोर्टनुसार, एक्स (X) चे TV ॲप YouTube TV ॲपसारखे दिसते. इलॉन मस्कने टीव्ही ॲपद्वारे X चे व्हिडिओ टीव्हीवर पाठवण्याची योजना आखली आहे. X च्या रेव्हेन्यू मॉडेलचा हा एक भाग देखील म्हणता येईल
इलॉन मस्क हळूहळू एक्स (X) व्हिडिओ प्लॅटफॉर्मकडे जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका खास शोसाठी एका विदेशी वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध अँकरसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय YouTuber मिस्टर बीस्टने त्याच्या एका व्हिडिओमधून X कडून $2,50,000 कमावले आहेत, त्यानंतर X कमाईच्या बाबतीत कंटेंट निर्मात्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.
YouTube शी स्पर्धा करणे सोपे नाही ?
इलॉन मस्कने यूट्यूबशी स्पर्धा करण्यासाठी X App / TV ॲप लाँच केले असले तरी ही स्पर्धा तितकी सोपी नाही. तुम्हाला जगातील सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये बाय डीफॉल्ट YouTube ॲप मिळेल. याचे मुख्य कारण म्हणजे इतर अनेक खेळाडू बाजारात दाखल झाल्यानंतरही गुगलचे टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर वर्चस्व कायम आहे.
काहीही असो, इलॉन मस्क जे काही करतो ते भव्य दिव्यच असते. आता You Tube ची मक्तेदारी जाऊन नवीन टेक्नॉलॉजीसह आपणास नवीन ॲप मिळणार आहे. कन्टेन्ट क्रिएटर साठी नवीन पर्याय खुला होणार आहे! मस्कचा अजून एक स्टार्टअप प्रोजेक्ट न्यूरॉलिंक कंपनी ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस (BCI) तंत्रज्ञान विकसित करत आहे. यातूनच विकसित होत असलेली न्यूरॉलिंक ब्रेन चिप जगात अनोखा बदल घडविण्यास तयार आहे. थोडक्यात सांगायचं तर, हे तंत्रज्ञान आपल्या विचारांच्या सहाय्यानं संगणक किंवा मोबाईल डिव्हाइस नियंत्रित करण्याची क्षमता देऊ शकेल. Trending News Nation