शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही विद्यार्थी परीक्षेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त संयुक्त प्रवेश परीक्षा (Additional CET) आयोजित करण्यात येणार आहे.
Additional CET ची मागणी
२९ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या सामाईक सीईटी मध्ये सहभागी होऊ न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी व संस्थानीं या काळा मध्ये कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून तसेच इ-मेल व्दारे व दूरध्वनी करून पुन्हा CET ची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, राज्य शासनाने या पदवी अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी आयोजित करण्याची मंजूरी दिली आहे.
Additional CET for BBA, BCA, BMS & BBM
तेंव्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, राज्य शासनाचे ऑर्डर नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एम.एस. आणि बी.बी.एम. या पदवी अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) लवकरच आयोजित केली जाणार आहे.
संबंधित परीक्षे बाबत अद्ययावत/लेटेस्ट माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन मिळविणे आवश्यक आहे.
- अतिरिक्त परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल.
- परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन किंवा ऑफलाइन (अद्याप घोषित नाही).
- अधिक माहितीसाठी: संबंधित विद्यापीठाच्या/संस्थेच्या वेबसाइटला भेट द्या.
विद्यार्थ्यांना काय करावे लागेल:
- अतिरिक्त परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर: विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या/संस्थेच्या सूचनांचे पालन करून अर्ज करावा लागेल.
- विद्यापीठाच्या/संस्थेच्या वेबसाइटला भेट द्या: नियमितपणे अपडेट्ससाठी आणि परीक्षेच्या तपशीलांसाठी विद्यापीठाच्या/संस्थेच्या वेबसाइटला भेट द्या.
- ही अतिरिक्त संधी फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे मूळ प्रवेश परीक्षेत उपस्थित राहू शकले नाहीत. विद्यापीठ/संस्था अतिरिक्त परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारे बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
अधिक माहितीसाठी:
- अधिकृत संकेतस्थळ: https://cetcell.mahacet.org/
- महत्वाची सूचना: येथे क्लिक करून पहा.