MAH-BBA/BCA/BMS/BBM Additional CET Exam-2024 नोंदणी साठी मुदत वाढली

महा-बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२४ परीक्षा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवाराची नोंदणी प्रक्रिया २९/०६/२०२४ ते ०३/०७/२०२४ पर्यंत चालू ठेवण्यात आली होती.

तथापि सदर नोंदणीसाठी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांचेकडून मुदतवाढी साठी मागणी करण्यात आली असल्याने त्यांचे भविष्याचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महा-बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२४ परीक्षा साठी नोंदणी प्रक्रियास नोटिसी द्वारे खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

BBA/BCA/BMS/BBM Additional CET नोंदणी साठी नवीन मुदत :

ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणेची प्रक्रिया ०४ जूलै २०२४ ते ०८ जुलै २०२४ पर्यंत चालू राहील.

दिनांक ०८/०७/२०२४ नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे द्वारे सांगण्यात आले आहे.

परीक्षेचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

BBA/BCA/BMS/BBM Additional CET 2024 च्या अधिक माहितीसाठी भेट द्या:

महा-बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२४ परीक्षा मुदतवाढीचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत नोटीस बघण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ: www.mahacet.org

महत्वाचे मुद्दे:

ही परीक्षा केवळ बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी आहे.

संबंधित:-

MAH-BBA/BCA/BMS/BBM/CET- 2024: महा बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी) 2024: महत्वाची माहिती

शैक्षणिक कर्ज: कसे, कुठे अप्लाय करावे? व्याज दर किती असतो ?

Leave a comment