सिबिल (CIBIL) स्कोअर सुधारण्याचे 10 सोप्पे मार्ग – जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात !

आपल्या आर्थिक व्यवहारावर बँका आणि इतर आर्थिक संस्था आपल्यावर विश्वास ठेवतात की नाही हे सिबिल स्कोअरमुळे ठरत असते. भारतात सिबिल (CIBIL) ही एक प्रमुख क्रेडिट माहिती कंपनी आहे जी व्यक्तींची तसेच व्यवसायांची क्रेडिट माहिती जमा करते आणि त्यावर आधारित स्कोअर प्रदान करते. तुम्हाला तुमच्या CIBIL स्कोअरबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा कशी करावी हे देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आपण सिबिल स्कोअरबद्दल सर्व काही जाणून घेऊया!

‘सिबिल स्कोअर (CIBIL Score)’ हे शब्द साधारणतः ‘क्रेडिट स्कोअर’ (Credit Score) च्या समानार्थीपणे वापरले जातात. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 दरम्यानचा 3-अंकी संख्यात्मक आकडा आहे जो तुमच्या क्रेडिट इतिहासचा सारांश दर्शवितो. CIBIL म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Transunion CIBIL Limited (पूर्वीची: Credit Information Bureau (India) Limited), एक भारतीय क्रेडिट रेटिंग ब्युरो ज्यांना तुमच्या क्रेडिट माहितीवर माहिती मिळविण्याचा परवाना आहे. ही माहिती म्हणजे तुम्ही घेतलेले कर्ज, तुमच्या कर्ज परतफेडीच्या सवयी, क्रेडिट कार्ड वापर, आणि याविषयीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा संदर्भ देते.

तुमच्या कर्ज भरणाची सवय, क्रेडिट कार्ड वापर, आणि इतर आर्थिक व्यवहार यावर आधारित हा स्कोअर दिला जातो. जेवढा तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे, याचाच अर्थ कर्जदाराला कमी व्याजदराने जास्त कर्जाची रक्कम मिळण्याची शक्यता जास्त असते.

सिबिल (CIBIL) स्कोअर सुधारण्याचे 10 सोप्पे मार्ग – जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात !

CIBIL कडे सुमारे 1000 कोटी हून अधिक व्यक्ती आणि व्यवसायांच्या क्रेडिटची माहिती आहे किंवा माहिती मिळविण्यासाठी प्रवेश (ॲक्सेस) आहे आणि 5,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत – ज्यात सर्व आघाडीच्या बँका, वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या आहेत ज्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जदारांचा समावेश आहे. CIBIL ही भारतातील सर्वात विश्वासार्ह क्रेडिट माहिती कंपन्यांपकी एक असल्याने, तिने तुमच्यासाठी दिलेला स्कोअर तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणून ओळखला जातो.

CIBIL स्कोअर श्रेणी:

खालील तक्त्यामध्ये विशिष्ट CIBIL स्कोअर श्रेणी काय सूचित करते आणि परिणामी, कर्जाच्या मंजुरीची शक्यता सूचीबद्ध केलेली आहे:

सिबिल स्कोअरपतपात्रताकर्ज मंजूरी शक्यता
<600लक्ष देण्याची गरज आहेकमी
600-649संशयास्पदअवघड
650-699समाधानकारक किंवा न्याय्यशक्य
700-749चांगलेचांगले
750-900उत्कृष्टखूप जास्त

तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे? तो महत्त्वाचा आहे का ?

तुमचा क्रेडिट स्कोअर एक अंकीत प्रणाली (Rating) म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो जो तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो. थोडक्यात फलंदाजी सरासरी (average) च्या रूपात तुमच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करुया. जर तुमची फलंदाजीची सरासरी ५० च्या वर असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुमचा ५० असा सातत्यपूर्ण स्कोअरिंग रेकॉर्ड आहे आणि तुम्ही चांगले बॅट्समन आहात, त्याचप्रमाणे, जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर जास्त असतो तेंव्हा हे दाखवले जाते कि तुम्ही भूतकाळात जबाबदारीने कर्जे घेतली आणि ती परतफेड केलेली आहेत.

तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा आहे कारण ते हे दाखवते की तुम्ही कर्जदार म्हणून किती विश्वासार्ह किंवा धोकादायक आहात. अशा प्रकारे, तुम्ही कर्जासाठी किती पात्र आहात, कर्ज देणारा तुम्हाला कर्जाची रक्कम म्हणून काय ऑफर करेल आणि तुमच्याकडून किती व्याज आकारले जाईल यावर त्याचा थेट परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोअर सावकारांना तुम्हाला पैसे देण्याच्या संभाव्य जोखमीचा निर्णय करू देतो. असुरक्षित किंवा विनातारण (Collateral-free) कर्जाच्या बाबतीत तुमचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो आणि वैयक्तिक कर्जासाठी तुमच्या पात्रतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो.

एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे स्कोअर असताना, व्यवसायांना देखील क्रेडिट स्कोअर दिले जातात. एखाद्या व्यवसायासाठी, CIBIL स्कोअर कर्जदाराला कंपनी किती विश्वासार्ह आहे हे ठरविण्यास मदत करते आणि यावरच कर्ज निर्णयाचा परिणाम ठरतो, व्यवसाय क्रेडिट स्कोअर गुंतवणूक आकर्षित करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम करू शकतो.

भारतातील क्रेडिट स्कोअरची पार्श्वभूमी:

RBI ने चार कंपन्यांना भारतात क्रेडिट माहिती मिळवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी परवाना दिला आहे. CIBIL ने 2001 मध्ये आपले उपक्रम सुरू केले आणि तेव्हापासून ती देशातील सर्वात लोकप्रिय क्रेडिट माहिती कंपन्यांपकी एक आहे. इतरांमध्ये Equifax, Experian आणि High Mark यांचा समावेश आहे. या प्रत्येक संस्थेची स्वतःची अद्वितीय स्कोअरिंग सिस्टीम आहे.

तथापि, सर्व स्कोअरमध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे तुमचा क्रेडिट इतिहास नसल्यास, तुमचा स्कोअर -1 असेल, त्याचप्रमाणे, जर तुमचा क्रेडिट इतिहास 6 महिन्यांपेक्षा कमी जुना असेल, तर तुम्हाला ० चे क्रेडिट रेटिंग मिळेल, याशिवाय या क्रेडिट माहिती कंपन्या सखोल क्रेडिट अहवाल देखील देतात. तुमचा क्रेडिट रिपोर्ट हा आधार आहे ज्यावर तुम्हाला क्रेडिट स्कोअर दिला जातो.

तुमचा CIBIL अहवाल किंवा क्रेडिट रिपोर्ट कसा वाचावा:

क्रेडिट रिपोर्ट हा एक तपशीलवार दस्तऐवज आहे जो तुमचा संपूर्ण क्रेडिट इतिहास आणि रेकॉर्ड हायलाइट करतो. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, रोजगार इतिहास, विविध क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा, क्रेडिट शिल्लक आणि तुम्ही विविध खाती उघडल्याच्या तारखा यांचा समावेश होतो. विविध पक्ष किंवा संस्था हा क्रेडिट अहवाल पाहतात.

काही सामान्य पक्ष जे तुमचा क्रेडिट अहवाल पाहू शकतात ते खालीलप्रमाणे आहेत:

  • सावकार (Creditors)
  • बँका आणि बिगर बैंकिंग वित्तीय कंपन्या यासारखे सावकार
  • जमीनदार (Landlords)

हे अहवाल अनेक विभागांसह सर्वसमावेशक दस्तऐवज आहे हे लक्षात घेता, तुमचा क्रेडिट अहवाल कसा वाचायचा हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जे तुम्हाला तुमचा अहवाल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि रिपोर्ट तुमच्या क्रेडिट इतिहासाला न्याय देत आहे की नाही हे देखील तपासता येईल.

सिबिल (CIBIL) स्कोअर सुधारण्याचे 10 सोप्पे मार्ग – जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात !

CIBIL रिपोर्ट मधील चार सर्वात महत्त्वाचे विभाग:

तुमच्या CIBIL अहवालातील चार सर्वात महत्त्वाचे विभाग खाली दिल्याप्रमाणे असतात.

1. क्रेडिट सारांश (Credit Summary)

या विभागात तुमच्या भूतकाळातील किंवा सध्या कोणत्या प्रकारच्या क्रेडिट खात्यांचा समावेश आहे. त्याच्या तपशिलांसह शिल्लक संबंधित तपशीलांचा समावेश आहे. सहसा, कर्ज खात्याची माहिती विविध भागांमध्ये विभागली जाते जसे की फिरती खाती (Revolving Accounts) जसे की क्रेडिट कार्ड, हप्ते खाती (Instalment Accounts) जसे की कार कर्ज, रिअल इस्टेट खाती (Real Estate Accounts) जसे की गृह कर्ज किंवा मालमत्तेवरील कर्ज, तसेच कोणतीही संग्रह खाती (Collection Accounts).

2. खाते इतिहास (Account History)

या विभागात तुमच्या क्रेडिट खात्यांशी संबंधित सर्व तपशील असतात. यामध्ये सावकाराचे नाव (Lender’s Name), तुम्ही घेतलेल्या कर्जाचा प्रकार आणि रक्कम, खाते क्रमांक, खाते उघडल्‌याची तारीख, तुम्ही तुमची सर्वांत अलीकडील पेमेंट केलेली तारीख, वर्तमान शिल्लक आणि तुमचे कर्ज परतफेडीचे मासिक वेळापत्रक (सामान्यतः 3 वर्षा पर्यंत) समावेश असतो.

3. प्रोफाइल माहिती (Profile History)

हा एक विभाग आहे ज्यामध्ये वर्तमान आणि पूर्वीच्या दोन्ही मोठया आर्थिक व्यवहाराची यादी दर्शवितो. यामध्ये गुन्हेगारी अटक किंवा दिवाळखोरी ची माहिती समाविष्ट आहे. या विभागाकडे विशेष लक्ष द्या आणि या त्रुटींची  कारणे ओळखा आणि भविष्यात तुम्ही त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या.

4. क्रेडिट चौकशी (Credit Inquiries)

जेंव्हा तुमचे क्रेडिट स्कोअर चेक केले जाते तेंव्हा सिबिल सिस्टम या प्रत्येकाची नोंद घेते. मागील दोन वर्षात जेंव्हा तृतीय पक्ष (Third party) ने तुमचा क्रेडिट अहवाल ॲक्सेस केला असेल त्या सर्व क्रेडिट चौकशी प्रसंगांची यादी सिबिल तयार करते. प्रत्येक वेळी सावकार(Lenders) तुमचा क्रेडिट अहवाल तपासतो तेव्हा तो चौकशी म्हणूनच गणला जातो. तुम्ही स्वतः सर्व क्रेडिट चौकशी पाहू शकत असले तरी, सावकार किंवा वित्तीय कंपन्या फक्त एक लहान कॉस-सेक्शन पाहू शकतात. लक्षात ठेवा की या चौकशी क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही केलेल्‌या कर्ज मागणी अर्जाचे (Application) परिणाम आहेत. त्यामुळे, संभाव्य सावकार तुमच्या क्रेडिट अहवालावर अनेक क्रेडिट चौकशी पाहू शकतो आणि असे समजू शकतो की तुम्ही अलीकडच्या काळात बरेच कर्ज मागणी अर्ज केले आहेत.

CIBIL तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना कशी करते?

तुमचा अंतिम CIBIL स्कोअर अनेक घटकांच्या आधारे मोजला जातो, ते खालीलप्रमाणे आहेत;

1.  तुमचा परतफेडीचा इतिहास – स्कोअरच्या 35% योगदान देतो

तुमचा एकूण परतफेडीचा इतिहास तुम्ही तुमचे सर्व कर्ज किती यशस्वीपणे फेडले आहे या वर अवलंबून आहे. परतफेडी ला दिलेले वेटेज खूप जास्त असल्‌याने, तुम्ही तुमच्या सर्व क्रेडिटसाठी वेळेवर पेमेंट केल्‌याची खात्री करा.

2. तुमची क्रेडिट शिल्लक आणि वापर – स्कोअरच्या 30% योगदान देते

हा विभाग तुम्हाला उपलब्य एकूण क्रेडिट आणि तुम्ही आधीच किती वापरला आहे याचा संदर्भ देतो. तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो महत्त्वाचा आहे आणि तुमची कर्ज किंवा क्रेडिट कार्डवरीत थकबाकी म्हणून गणना केली जाते. तुम्ही तुमच्या मंजूर क्रेडिट पैकी बहुतांश वापर केला असल्‌यास, तुम्हाला पोकादायक कर्जदार मानले जाईल, चांगले गुणोत्तर 30% आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या क्रेडिट पैकी फक्त 30% वापरला आहे.

3.  तुमचा क्रेडिट मिळवण्याचा कालावधी – स्कोअरच्या 15% पर्यंत योगदान देते

हे या कालावधीत परतफेड कालावधी आणि वेळेवर परतफेड यांचा संदर्भ देते. जर तुम्ही दीर्घ परतफेडीच्या कालावधीसाठी कर्ज घेतले असेल आणि जबाबदारीने आणि यशस्वीपणे परतफेड केली असेल, तर तुमच्या स्कोअरवर सकारात्मक परिणाम होईल किंवा नसेल तर त्याउलट,

4.  तुमचे नवीन क्रेडिट – स्कोअरच्या 15% पर्यंत योगदान देते

प्रत्येक वेळी तुम्ही क्रेडिट बद्दल चौकशी करता, तुमच्या स्कोअरवर याचा परिणाम होतो. हे तुम्ही घेण्याची योजना करत असलेल्या कर्जाचा किंवा तुम्ही साइन अप करू इच्छित असलेल्या क्रेडिट कार्डाच संदर्भ घेऊ शकता. जर तुम्ही खूप जास्त क्रेडिट चौकशी केली असेल तर, यामुळे तुम्ही कर्जदारांच्या नजरेत क्रेडिट भुकेले आहात आणि तुमच्या स्कोअरवर याचा नकारात्मक परिणाम होतो.

5.  तुमचे क्रेडिट मिक्स – स्कोअरच्या 10% पर्यंत योगदान देते

क्रेडिट चे निरोगी मिश्रण असणे नेहमीच महत्त्वाचे असते, जे सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज तसेच अल्प -मुदतीचे आणि दीर्घकालीन क्रेडिट चा संदर्भ देते. त्यामुळे, तुमच्याकडे गृहकर्ज, क्रेडिट कार्ड आणि गहाणमुक्त वैयक्तिक कर्ज असल्‌यास, तुमच्याकडे हेल्‌दी क्रेडिट मिक्स आहे असे मानले जाते.

CIBIL Equifax, Experian आणि High Mark मध्ये काय फरक आहे?

या चार क्रेडिट माहिती कंपन्या आहेत ज्या RBI च्या मान्यतेखाली काम करतात, त्यांची समानता आणि फरक खाली सूचीबद्ध आहेत.

1. सिबिल (CIBIL)

  1. CIBIL आज भारतातील सर्वांत जुने आणि लोकप्रिय आहे. तसेच, हे CIBIL स्कोअर आणि व्यक्तीसाठी अह‌वाल व्यतिरिक्त  व्यवसायांसाठी बाजार अंतर्दष्टी आणि पोर्टफोलिओ पुनरावलोकने ऑफर करते.
  2. त्याची स्कोअरिंग सिस्टीम 300 ते 900 पर्यंत आहे, 900 सर्वोच्च आणि 300 किमान CIBIL स्कोअर आहे.
  3. हे व्यवसायांना कंपनी क्रेडिट अहवाल आणि CIBIL रँक देते.

2. इक्विफॅक्स (Equifax)

  1. इक्विफॅक्स (Equifax) ला 2010 मध्ये परवाना देण्यात आला. 
  2. त्याची स्कोअरिंग सिस्टम 300 ते 900 च्या स्केलवर आहे. 300 सर्वांत कमी आणि 900 सर्वात जास्त आहे.
  3. हे क्रेडिट जोखीम आणि फसवणूक व्यवस्थापन, पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि उद्योग निदान यासारख्या अतिरिक्त सुविधा देखील देते.

3. एक्स्पेरियन (Experian)

  1. एक्स्पेरियन 2006 पासून ती आंतरराष्ट्रीय कंपनी आहे परंतु तीला भारतात ऑपरेशनसाठी 2010 मध्ये परवाना मिळाला आहे.
  2. एक्सपेरियन स्कोअर 300 ते 900 पर्यंत आहे. 300 सर्वात कमी आणि ९०० सर्वोच्च आहे.
  3. हे ग्राहक आणि संस्थांसाठी ग्राहक संपादन(Customer Acquisition), संकलन आणि पैसे पुनर्प्राप्ती (Collection and Money Recovery), ग्राहक व्यवस्थापन, डेटा विश्लेषण, ग्राहक लक्ष्यीकरण आणि प्रतिबद्धता (Customer Targeting & engagement) यासारख्या अनेक सेवा देतात.

4. हाय मार्क (High mark)

  1. 2007 पासून ते कार्यरत आहे; तथापि, तिला 2010 मध्ये क्रेडिट माहिती कंपनी म्हणून परवाना मिळाला.
  2. त्यांची स्कोअर रेटिंग सिस्टिम 300 ते 900 गुणांपर्यंत आहे. 720 आणि त्यापेक्षा जास्त गुण चांगले मानले जातात, तर 640 आणि त्यापेक्षा कमी गुण कमी मानले जातात.
  3. हे ग्राहकांसाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन(Portfolio Management), सूचना (Alerts) आणि भू-विश्लेषण सल्ला (Geo-analytics consulting) सारख्या विविध सेवा देतात.

यापैकी कोणत्याही कंपनीमधून तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोअर ची तपासणी करू शकता आणि तसेच सावकार(Finance कंपन्या) आणि इतर पक्ष देखील करू शकता.

तुमचा CIBIL स्कोअर कसा तपासायचा?

तुमचा क्रेडिट स्कोअर कोठे तपासायचा असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुम्ही क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन ते सहज करू शकता. सहसा, तुमचा स्कोअर तपासण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी फी भरावी लागते. काही बँकां त्यांच्या ग्राहकांसाठी ही सुविधा फुकट देतात. ज्या बँकांचे तुम्ही खातेदार आहात त्या बँकेच्या वेबसाईट वर किंवा मोबाइल ॲप वर तुम्हाला याविषयी माहिती मिळू शकते.

तुमचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सावकार(Lender) तुमचा CIBIL स्कोअर का तपासतात?

सिबिल स्कोअर तुमची एकंदर पतपात्रता मोजत असल्‌याने, तुमच्या कर्ज अर्जाचे विविध कारणांसाठी पुनरावलोकन करताना सावकाराने तुमचा स्कोअर तपासणे निश्चित आहे. ते आहेत:

  1. तुमचा क्रेडिट इतिहास आणि मागील रेकॉर्ड तपासण्यासाठी
  2. तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम आहात की नाही हे पाहण्यासाठी
  3. तुमच्या क्रेडिट शिल्लकचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि तुमच्या प्रोफाइलची जोखीम पातळी समजून घेण्यासाठी
  4. तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे ठरवण्यासाठी
  5. तुम्हाला कर्जाची रक्कम ऑफर करण्यासाठी आणि लागू व्याजदर यावर निर्णय घेण्यासाठी.

CIBIL स्कोअरवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?

तुमच्या स्कोअरचे महत्व लक्षात घेता, ते नेहमी वरच्या दिशेने असल्‌याची खात्री करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणाऱ्या घटकाची माहिती असणे आणि त्यानुसार त्यांचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे. CIBIL स्कोअरवर परिणाम करणारे घटक येथे आहेत;

• तुमचे उत्पन्न

• तुमची विद्यमान कर्ज

• तुमची मागील क्रेडिट परतफेड

• मागील क्रेडिट परतफेडीमध्ये कोणतीही चूक(default), विलंब किंवा त्रुटी

• तुम्ही केलेल्या कर्ज मागणी अर्जाना नकार (Loan Application Rejection)

थकित कर्जामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो?

थकित कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करते. सावकार सामान्यतः क्रेडिट युटिलायझेशन रेशो च्या  रूपात हे तपासतात. हे तुम्हाला उपलब्ध असलेल्‌या एकूण क्रेडिटपेकी तुम्ही वापरत असलेल्‌या रकमेचा संदर्भ देते. गुणोत्तर जितका जास्त  तितका तुमचा क्रेडिट स्कोअर कमी. तथापि, याचा अर्थ असा नाही की कर्ज तुमच्यासाठी वाईट आहे. खरे तर, जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हाच तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करू शकाल, मुख्य म्हणजे ते वेळेवर फेडणे आणि तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बैंक खात्याची मर्यादा ओलांडू नये.

क्रेडिट स्कोअरसाठी तुमचे थकित कर्ज वाईट का असते?

1. क्रेडिट युटिलायझेशन रेशो जास्तीत जास्त कसा राखावा ?

  • चांगला क्रेडिट वापर गुणोत्तर 30% किंवा कमी आहे. 
  • उच्च गुणोत्तर म्हणजे तुम्ही खूप जास्त क्रेडिट वापरत आहात, ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.

2. भविष्यातील कर्जाची परतफेड करणे कठीण कशामुळे होते:

  • तुमच्याकडे थकित कर्ज असल्‌यास, याचा अर्थ असा की तुम्ही आधीच उच्च EMI भरत असाल.
  • थकित असलेल्या कर्जासह भविष्यात अधिक कर्ज घेतल्यास परतफेडीचा मोठा भार निर्माण होऊ शकतो आणि दिवाळखोरी देखील होऊ शकते.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर काय आहे?

वैयक्तिक कर्जा (Personal Loan) साठी किमान CIBIL स्कोअर 700 किंवा 750 आहे. जो सावकारावर अवलंबून असतो. वैयक्तिक कर्जासाठी हा CIBIL स्कोअर मिळाल्याने तुमचा वैयक्तिक कर्ज अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढू शकते.

व्यवसाय कर्जाचा लाभ घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर काय आहे?

जर तुम्ही गहाणमुक्त (Collateral-free) व्यवसाय कर्जाची निवड करत असाल तर व्यवसाय कर्ज मिळविण्यासाठी CIBIL स्कोअर 700 आणि त्याहून अधिक असलेला उत्तम आहे.

गृहकर्ज मिळविण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर काय आहे?

गृहकर्जाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान ६५० किंवा त्याहून अधिक CIBIL स्कोअर असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. गृहनिर्माण कर्ज हे सुरक्षित कर्ज असल्‌याने, तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसल्‌यास सावकारां (Financer)कडे तुमचे घर जप्त करण्याचा पर्याय आहे. म्हणूनच थोडासा कमी क्रेडिट स्कोअर असला तरी चालतो. तथापि, चांगला क्रेडिट स्कोअर राखणे आपल्‌याच  हिताचे आहे जेणेकरून आपल्‌याला नाममात्र व्याजाने मोठी कर्ज रक्कम मिळू शकेल.

CIBIL स्कोअर चांगला कसा राखायचा?

या खाली दिलेल्या काही सोप्या पद्धतीचे अनुसरण करून तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर चांगला राखू शकता;

  1. योग्य ट्रॅक रेकॉर्ड तयार करण्यासाठी तुमचे कर्ज हप्ते (EMI) वेळेवर भरा
  2. तुम्ही वापरत नसलेले क्रेडिट कार्ड बंद करा: निष्क्रिय क्रेडिट कार्ड रद्द करा
  3. पेमेंट स्मरणपत्रे सेट करून किंवा एका क्रेडिट कार्डवर तुमचा वापर मर्यादित करून तुमचे क्रेडिट कार्ड काळजीपूर्वक व्यवस्थापित करा 
  4. ज्या कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला झटपट मंजुरी मिळाठी नाही त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज करणे टाळा.
  5. कमी कालावधीत खूप जास्त कर्ज अर्ज करू नका
  6. सावधगिरीने लांबलचक कर्जाची मुदत निवडा आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा अर्धवट प्रीपेमेंट करण्याचा प्रयन करा.

क्रेडिट स्कोअर खराब असूनही कर्ज कसे मिळवायचे?

  • नॉन-बैंकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घ्या:

काही नॉन-बैंकिंग वित्तीय कंपन्या तुमचा क्रेडिट स्कोअर कमी अजूनही कर्ज देतात. त्यांच्याकडे तुलनेने सोपे पात्रता निकष असतात, जे तुम्हाला जलद आणि जास्त प्रयत्न न करता निधी उभारण्यात मदत करू शकतात. तुलनेने व्याजदर जास्त असू शकते.

  • कर्जासाठी जामीनदार किंवा सह-स्वाक्षरीदारासह अर्ज करा:

तुमच्या कर्जाच्या अर्जामध्ये सह-कर्जदार जोडल्याने तुम्ही आणि सह-कर्जदार यांच्यात परतफेडीची जबाबदारी वितरीत करण्यात मदत होते. तुमच्या सह-कर्जदाराचा स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही मोठ्या कर्जाची रक्कम घेऊ शकता आणि तुमच्या मंजुरीची शक्यता देखील वाढवू शकता.

  • सुरक्षित कर्ज शोधण्याचा प्रयत्न करा:

कर्ज असुरक्षित असताना, सावधगिरीने फिल्टर करून आणि सर्वात विश्वासार्ह कर्जदारांची निवड करून कर्ज देणारा पात्रता निकष अधिक कठोर असतो. तथापि, आपल्‌याकडे ऑफर करण्यासाठी संपाश्र्विक असल्‌यास, चांगता क्रेडिट स्कोअर असण्याचे महत्व कमी होते.

  • तुमचे आर्थिक पाठबळ (Financial Backing) सिद्ध करा:

तुमचा  क्रेडिट स्कोअर खराब असल्यास, तुमच्या कर्जदात्याचा नवीन कर्जाची परतफेड करण्याच्या तुमच्या क्षमतेवर शंका असेल किंवा मर्यादित विश्वास असेल. त्यामुळे, तुम्ही कर्जाची परतफेड करण्याच्या तुमच्या आर्थिक क्षमतेबद्दत पुरावे सादर करू शकता, तुमच्याकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी निधी आहे हे सावकाराला सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नफा-तोटा स्टेटमेंट, बैंक बॅलन्स, बैंक खाते स्टेटमेंट, FD स्टेटमेंट, भाड्याचे उत्पन्न इत्यादी कागदपत्रे दाखवू शकता.

  • तुमचा स्कोअर सुधारण्यासाठी उपाय करा:

तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यापेक्षा कोणतीही चांगली युक्ती नाही. तुम्ही हे विविध पद्धतींनी करू शकता आणि हा बदल सहा महिने किंवा एक वर्षाच्या कालावधीनंतर तुमच्या स्कोअरमध्ये दिसून येईल.

  • कर्ज घेण्याच्या अनौपचारिक माध्यमांचा अवलंब करा:

जेव्हा तुम्हाला  पैशांची गरज असते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असतो, तेव्हा कुटुंब किंवा मित्रांसारख्या इतर स्रोतांकडून मदत घेऊन क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्याकडे निधी असेल तेव्हा तुम्ही ही कर्जे सोयीस्करपणे परत करू शकता.

तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी 10 सोपे मार्ग

  1. तुम्हाला त्याच वेळी कर्ज घेण्याची आवश्यकता नसल्यास कर्जासाठी राह-स्वाक्षरीदार होऊ नका.
  2. कमी कालावधीत खूप जास्त कर्ज घेणे टाळा.
  3. तुम्ही तुमची सर्व EMI आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा.
  4. आवश्यकतेनुसार कर्जे एकत्रीकरण करून वापरा जेणेकरून तुमची देय रक्कम कर्ज वसुली एजन्सीकडे सुपूर्द केली जाणार नाही.
  5. योग्य परतफेड योजनेशिवाय कर्ज घेण्याबाबत सावधगिरी बाळगा.
  6. तुमचा खर्च कमी ठेवण्यासाठी नेहमी तुमच्या व्याजदर कमी करण्यासाठी सावकारांशी वाटाघाटी करा.
  7. तुम्हाला मंजूरी मिळालेली संपूर्ण रक्कम कर्ज घेऊ नका.
  8. तुमच्या कर्जाची जलद आणि कमी व्याजाची परतफेड करण्यासाठी एक लहान कर्ज कालावधी निवडा.
  9. कर वाचवण्यासाठी आणि तुमचे पैसे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी CA किंवा आर्थिक नियोजक (Financial Planner) यांची मदत मिळावा.
  10. तुमच्याकडे कोणताही क्रेडिट इतिहास (Credit History) नसल्‌यास, एक लहान वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घ्या आणि क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी वेळेवर परतफेड करा.

Trending News Nation

शैक्षणिक कर्ज: कसे, कुठे अप्लाय करावे? व्याज दर किती असतो ?

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana)

Leave a comment