LLB CAP Registration (कॅप रजिस्ट्रेशन): विषयी आजची महत्वाची माहिती

एलएल.बी 3 वर्ष CAP शेड्यूल २०२४

LLB CAP Registration (कॅप रजिस्ट्रेशन): for LLB-3 Years Cource Academic Year 2024-25


दिनांक: 10/07/2024

एमएस/ओएमएस (MS/OMS) आणि एनआरआय/ओसीआय/पीआयओ/एफएनएस आणि सीआयडब्ल्यूजीसी (NRI/OCI/PIO/FNS and CIWGC) उमेदवारांसाठी एलएल.बी 3 वर्ष सीएपी शेड्यूल २०२४ जाहीर करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे महत्त्वाच्या तारखा आहेत:

CAP Round-1

१. उमेदवार नोंदणी:

  • एमएस/ओएमएस (MS/OMS) उमेदवारांसाठी: ११/०७/२०२४ ते १८/०७/२०२४
  • एनआरआय/ओसीआय/पीआयओ/एफएनएस आणि सीआयडब्ल्यूजीसी (NRI/OCI/PIO/FNS and CIWGC) उमेदवारांसाठी: ११/०७/२०२४ ते १०/०८/२०२४

२. ई-छाननी:

  • ई-छाननी टीमद्वारे अपलोड केलेल्या दस्तऐवजांची आणि अर्जांची पडताळणी: ११/०७/२०२४ ते २१/०७/२०२४
  • एनआरआय/ओसीआय/पीआयओ/एफएनएस आणि सीआयडब्ल्यूजीसी (NRI/OCI/PIO/FNS and CIWGC) उमेदवारांसाठी तज्ञ समितीद्वारे अपलोड केलेल्या दस्तऐवजांची आणि अर्जांची पडताळणी: ११/०७/२०२४ ते १२/०८/२०२४

३. फेरी १ साठी वर्णानुक्रमानुसार यादी (Alphabetical List) चे प्रदर्शन: २३/०७/२०२४

४. वर्णानुक्रमानुसार यादी (Alphabetical List) संबंधित तक्रारी सोडविणे आणि अर्ज सुधारणा:

  • उमेदवारांना अर्जामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करण्याची संधी: २३/०७/२०२४ ते २६/०७/२०२४

५. फेरी १ साठी अंतिम गुणवत्ता यादीचे प्रकाशन (Publication of final Merit list for Round 1):
दिनांक: २९/०७/२०२४ (संध्याकाळी)

सर्व उमेदवारांनी वरील शेड्यूलनुसार आवश्यक त्या कार्यवाही करावी आणि वेळेत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

LLB CAP Registration (कॅप रजिस्ट्रेशन): for LLB-5 Years Integrated Cource

दिनांक 08/07/2024

LLB-5 Years Integrated Cource साठी CAP Registration (कॅप रजिस्ट्रेशन) सुरु झाले असून दिनांक 08/07/2024 ते 13/07/2024 पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

Tentative Schedule For LLB-5 Years Integrated Cource A.Y. 2024-25

CAP Round-1 :

  1. MS/OMS उमेदवारांसाठी नोंदणी: 08/07/2024 ते 13/07/2024

1A. NRI/OCI/PIO/FNS आणि CIWGC उमेदवारांसाठी नोंदणी: 08/07/2024 ते 25/07/2024

  1. e-स्क्रुटनी (e-सत्यापन) टीमकडून अपलोड केलेल्या कागदपत्रांची व अर्जांची पडताळणी: 08/07/2024 ते 14/07/2024

2A. NRI/OCI/PIO/FNS आणि CIWGC उमेदवारांसाठी विशेषज्ञ समितीकडून अपलोड केलेल्या कागदपत्रांची व अर्जांची पडताळणी: 08/07/2024 ते 26/07/2024

  1. पहिल्या राऊंडसाठी वर्णमाला (अल्फाबेटिकल) यादीचे प्रदर्शन: 15/07/2024
  2. अल्फाबेटिकल यादी संबंधित तक्रारींचे निराकरण, उमेदवारांनी अर्ज संपादित करणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे: 15/07/2024 ते 17/07/2024
  3. पहिल्या राऊंडसाठी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) चे प्रकाशन: 19/07/2024 (संध्याकाळी)

हे ही वाचा!

बॅचलर नसतांना एलएलबी ची डिग्री घेतली! बार कौन्सिल ने वकिलीचे नामांकन नाकारले: हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने बरोबर ठरवले!

दिनांक 06/07/2024 रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई च्या वेबसाईट वरील अपडेट्स नुसार cet cell ने नऊ कोर्सेस साठी कॅप रजिस्ट्रेशन च्या अंदाजे तारखा (Tentative Dates) नोटीसी व्दारे जाहीर केल्या आहेत.

कायदा अर्थात एल एल बी च्या तीन व पाच वर्षाच्या कोर्सेस साठी Centralized Admission Process म्हणजेच CAP-2024-25 साठी टेंटॅटीव्ह तारखा खालील प्रमाणे आहेत.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या सूचनेनुसार LLB 5 वर्ष कोर्ससाठी LLB CAP Registration दिनांक 08/07/2024 रोजी सुरु होऊ शकतात.

तर LLB 3 वर्ष कोर्ससाठी LLB CAP Registration दिनांक 10/07/2024 रोजी सुरु होऊ शकतात.

अधिकृत वेबसाईटवरील सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून पालन करावे.

04/07/2024: आज दिनांक ४ जुलै पर्यंत LLB CAP रजिस्ट्रेशन सुरु झालेले नसल्याने अनेक विध्यार्थी काळजी करत आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी LLB च्या कोर्सेससाठी LLB CAP Registration लवकरच सुरु होणार आहे. तथापि, काही विद्यापीठांच्या सामाईक प्रवेश परीक्षा निकाल अजूनही प्रलंबित असल्यामुळे कॅप राऊंड सुरु करण्यात काही विलंब झाला आहे.

LLB CAP Registration विषयी अपडेट:

विद्यार्थ्याना रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर SMS व रजिस्टर्ड E-mail वरती त्याविषयी चे अपडेट्स दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यानीं आपापले रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरील SMS व रजिस्टर्ड E-mail चे अपडेट्स वेळोवेळी घेत राहणे फार गरजेचे आहे.

कधीकधी टेक्निकल अडचनी मुळे LLB CAP Registration चे अपडेट्स मिळाले नाही तर नुकसान नको म्हणून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहावे, जेणेकरून त्यांना नवीनतम माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार ते आपले कॅप रजिस्ट्रेशन वेळेवर करू शकतील.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे:

  1. LLB CAP रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
  2. विद्यार्थ्यानीं आपापले रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरील SMS व रजिस्टर्ड E-mail चे अपडेट वेळोवेळी घेत राहणे फार गरजेचे आहे.
  3. आवश्यक कागदपत्रे आणि तपशील तयार ठेवा.
  4. विद्यापीठांच्या निकालांची माहिती वेळोवेळी तपासा.
  5. अधिकृत वेबसाईटवरील सर्व सूचनांचे पालन करा.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी LLB कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ही महत्त्वाची सूचना लक्षात ठेवावी.

संबंधित:-

शैक्षणिक कर्ज: कसे, कुठे अप्लाय करावे? व्याज दर किती असतो ?

Leave a comment