UPSC NDA Result 2024 Announced: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ( UPSC ) ची राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेचा लिखित परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. NDA 1 परीक्षेचा निकाल आधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षार्थी त्यांचे निकाल या संकेतस्थळावर तपासू शकतात. या परीक्षेद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय नौदल अकादमी मध्ये 400 प्रशिक्षण पदांची भरती केली जाणार आहे.
ही लिखित परीक्षा भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलातील एनडीएच्या 153 व्या कोर्स आणि 2 जानेवारी 2025 पासून सुरु होणाऱ्या 115 व्या भारतीय नौसेना अकादमी (आयएनएसी) कोर्समध्ये प्रवेशासाठी 21 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेद्वारे 400 प्रशिक्षार्थी पदांची भरती केली जाणार आहे.
यशस्वी उमेदवारांची अंतिम निवड लिखित परीक्षा आणि SSB मुलाखत यांच्यावर आधारित असेल. SSB मुलाखत ही 900 गुणांची असते.
UPSC NDA Result 2024: निकाल कसा पाहाल? (How to Check the Result)
- UPSC ची अधिकृत संकेतस्थळ – upsc.gov.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील “निकाल” (Result) या टॅबवर क्लिक करा.
- UPSC NDA Result साठी असलेल्या pdf लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परीक्षा क्रमांक शोधण्यासाठी “Ctrl + F” दाबा.
- पुढील संदर्भासाठी pdf जतन करा आणि डाउनलोड करा.